Dog Sexually Assaulted : मुंबईत डिलिव्हरी बॉयकडून कुत्र्यावर लैंगिक अत्याचार, पोलिसांकडून अटक

Dog Sexually Assaulted : मुंबईत  एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका डिलिव्हरी बॉयने कुत्र्यावर लैंगिक अत्याचार केले आहेत. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी २८ वर्षीय आकाशला अटक केली आहे. अशाच प्रकारे मागच्या वर्षी एका कुत्रीवर अत्याचार करण्यात आले होते.

Dog Sexually Assaulted :
कुत्र्यावर लैंगिक अत्याचार  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • मुंबईत  एक धक्कादायक घटना समोर आली आहे.
  • एका डिलिव्हरी बॉयने कुत्र्यावर लैंगिक अत्याचार केले आहेत.
  • या प्रकरणी पोलिसांनी आरोपी २८ वर्षीय आकाशला अटक केली आहे.

Dog Sexually Assaulted : मुंबई : मुंबईत  एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका डिलिव्हरी बॉयने कुत्र्यावर लैंगिक अत्याचार केले आहेत. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी २८ वर्षीय आकाशला अटक केली आहे. अशाच प्रकारे मागच्या वर्षी एका कुत्रीवर अत्याचार करण्यात आले होते. 

अधिक वाचा : Amravati : दुर्दैवी ! दुमजली इमारत कोसळून पाच जणांचा मृत्यू, घटनास्थळाचा Video आला समोर

मिळालेल्या माहितीनुसार 61 वर्षीय मिनू शेठ या मुंबई प्राणी हक्क संघटनेच्या कार्यकर्त्या आहेत. त्या पवईच्या रहिवासी असून रस्त्यावरील कुत्र्यांना खाऊ घालतात. 29 ऑक्टोबर रोजी शेठ यांना एक व्हिडीओ मिळाला. त्यात एक व्यक्ती सहा वर्षाच्या कुत्र्यावर लैंगिक अत्याचार करताना दिसत होता. हिरा पन्ना मॉलच्या दुसर्‍या मजल्यावर ही व्यक्ती कुत्र्यावर अत्याचार करत होता. आरोपी आकाश या कुत्र्यावर गेल्या अनेक दिवसांपासून लैंगिक अत्याचार करत होता. तेव्हा आकाशच्या एका सहकर्मचार्‍याने त्याचा व्हिडीओ शूट केला आणि त्याच्या इतर सहकर्मचार्‍यांना पाठवला. हा विडीओ मिनू शेठ यांच्यापर्यंत पोहोचला. जेव्हा शेठ यांनी हा व्हिडीओ पाहिला तेव्हा त्या हादरून गेल्या. 

अधिक वाचा : Mumbai : ...त्यांचा उद्या आणखी एक घोटाळा बाहेर काढणार, किरीट सोमय्या दादर पोलीस ठाण्यात

मिनू यांनी तत्काळ पोलीस स्थानकात धाव घेतली आणि आरोपीविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी यावर तातडीने कारवाई केली आणि आरोपीचा शोध घेऊन त्याला अटक केली. पोलिसांनी प्राणी हक्क कायद्याखाली आरोपी आकाशला अटक केली. आकाशला कोर्टात हजर केल्यानंतर त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. 

अधिक वाचा : Police Recruitment: नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या पोलीस भरतीला तात्पुरती स्थगिती, आता पुढे काय? वाचा सविस्तर...

दुसरी घटना

अशा प्रकारे कुत्र्यावर लैंगिक अत्याचार होण्याची ही पहिलीच घटना नाही. मागच्या वर्षी पवईतच एका कुत्रीवर लैंगिक अत्याचार करून तिच्या गुप्तांगात काठी घालण्यात आली होती. तेव्हा जखमी कुत्री रक्ताच्या थारोळ्यात पडली. होती. आताही अशाच प्रकारे एका कुत्र्यावर अत्याचार करण्यात आला आहे. या कुत्र्याची वैद्यकीय चाचणी करण्यात आली असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. हा कुत्रा खुपच घाबरला असून या कुत्र्याला कुणीतरी दत्तक घ्यावे असे आवाहन मिनू शेठ यांनी केले आहे.  

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी