Maharashtra Assembly Session : मुंबई : उद्यापासून विधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Eknath Shinde)आणि उपमुख्यमंत्री (Deputy Chief Minister)देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)यांनी पत्रकार परिषद (Press conference) घेतली. या परिषदेत मुख्यमंत्र्यांनी आपलं मार्केटमध्ये वजन आहे, हे सांगावं लागलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर निशाणा साधत होते. त्यावेळी आपलं मार्केटमध्ये वजन का आहे हे सांगितलं. (...so I have some weight in the market right? Why did Mr. Cm Shinde say?)
अधिक वाचा : Images द्वारे पाठवा मराठी राजभाषा दिनानिमित्त शुभेच्छा संदेश
उद्यापासून विधीमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी एकत्रित पत्रकार परिषद घेतली. यावेळी एक किस्सा घडला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पहाटेच्या शपथविधीच्या मुद्द्यावरुन विरोधी पक्षनेते अजित पवारांवर टीका करायला सुरुवात केली. पण त्याचवेळी एक किस्सा घडला. देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांना उद्देशून महत्त्वाचं वक्तव्य केलं. त्यानंतर भर पत्रकार परिषदेत हशा पिकला. त्यानंतर मुख्यमंत्र्यांना आपलं वजन का आहे ते सांगावं लागलं.
अधिक वाचा : मराठी राजभाषा दिनानिमित्त पाठवा मराठमोळ्या शुभेच्छा संदेश
अजित पवार यांच्यावर टीका करताना मुख्यमंत्री म्हणाले की, “अजित पवार हे एकनाथ शिंदे यांनी निष्ठा बदलली म्हणता. आता मी असं बोलू शकतो, अजित पवारांनी दिवसातून तीनवेळा म्हणजे देवेंद्र फडणवीसांची शपथ घेतली, नंतर राष्ट्रवादीत गेले. मी ते नाही केलं. मी बाळासाहेब ठाकरे यांचे विचार घेऊन पुढे गेलो. अगदी सगळ्यांनी मान्य केलंय”, असं एकनाथ शिंदे म्हणत असतानाच उपमुख्यमंत्री म्हणाले, “आणि माझ्यासोबत घेतलेल्या शपथेवर तुम्ही कायम आहात”. फडणवीसांच्या या वक्तव्यानंतर भर पत्रकार परिषदेत एकच हशा पिकला. त्यानंतर शिंदे यांनी फडणवीसांच्या वक्तव्यावर उत्तर दिलं.
मी कायमच असतो. एकदा निर्णय घेतला तर परत फिरत नाही. त्यामुळे मार्केटमध्ये थोडं तरी माझं वजन आहे ना?, असं एकनाख शिंदे म्हणाले. “अजित पवारांची परिस्थिती मी समजू शकतो. आरोप करताना पुरावा पाहिजे. अन्यथा आरोप कुणीही करू शकतो. आरोप करताना आपण मोठ्या पदावर राहिलेले आहात हे लक्षात ठेवलं पाहिजे”, असं एकनाथ शिंदे यांनी सुनावलं.
अधिक वाचा : जाणून घ्या कोणत्या राशींसाठी आठवड्यातील पहिला दिवस असेल भारी
लोकायुक्तांचं विधेयक मंजूर करण्याचा या विधीमंडळाच्या अधिवेशनात प्रयत्न असेल. सर्व पक्षांनी लोकायुक्ताच्या कायद्याला पाठिंबा द्यावा, असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. विरोधकांनी विधीमंडळात लोकहिताचे मुद्दे मांडवेत. त्यांच्या प्रश्नावर उत्तरं द्यायला आम्ही तयार आहोत, असं यावेळी उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले.
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.