Maharashtra Day : येत्या महाराष्ट्र दिनी सुरू होणार गडचिरोली येथे मृद व जलसंधारण विभागाचे कार्यालय, मंत्री शंकरराव गडाख यांची माहिती

आदिवासी व नक्षलग्रस्त जिल्हा असलेल्या गडचिरोलीमध्ये मृद व जलसंधारणाची कामे लवकर होण्यासाठी आता या विभागामार्फत येत्या 1 मे पासून नवीन कार्यालय सुरु करण्यात येणार असल्याची माहिती मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी दिली.

shankarrao gadakh
शंकरराव गडाख  

Gadchiroli Office : मुंबई :  आदिवासी व नक्षलग्रस्त जिल्हा असलेल्या गडचिरोलीमध्ये मृद व जलसंधारणाची कामे लवकर होण्यासाठी आता या विभागामार्फत येत्या 1 मे पासून नवीन कार्यालय सुरु करण्यात येणार असल्याची माहिती मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी दिली.

सर्वात जास्त वनसंपदा असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात स्वतंत्र विभागीय कार्यालय कार्यान्वित नव्हते. हा जिल्हा चंद्रपूर येथील कार्यकारी अभियंता यांच्या कार्यक्षेत्रात होता. आता तो स्वतंत्र झाल्याने जलसंधारण विभागाची कामे गतीने होण्यास मदत होणार असून आदिवासी बांधवांना संरक्षित सिंचन सुविधा निर्माण होण्यास मदत होणार असल्याचे श्री. गडाख यांनी सांगितले.

मृद व जलसंधारण विभागाचे एक नवीन जिल्हा जलसंधारण अधिकारी कार्यालय निर्माण करण्यात येणार असून या कार्यालयासाठी 16 पदांचा आकृतीबंध मंजूर करण्यात आला आहे. गडचिरोली जिल्ह्यांतर्गत 3 उपविभाग येणार आहेत. गडचिरोली उपविभागाअंतर्गत गडचिरोली, धानोरा, चामोर्शी, मुलचेरा हे तालुके असतील. अहेरी उपविभागाअंतर्गत अहेरी, सिरोंचा, भामरागड आणि एटापल्ली हे तालुके येतील. तर वडसा उपविभागाअंतर्गत वडसा, आरमोरी, कुरखेडा आणि कोरची हे तालुके येतील.
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी