मुंबई : शिवसेना (ShivSena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या घरी ईडीच्या (ED) पथकाने धाड टाकली आहे. पत्रा चाळ (Patra Chaal) घोटाळा (Scam) प्रकरणी ही धाड टाकली असल्याचे सांगण्यात येत आहे. राऊतांवर करण्यात आलेल्या या कारवाईचे भाजपा (BJP) नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya ) यांनी स्वागत केले आहे. “माफिया संजय राऊत यांना आता हिशोब द्यावा लागणार”, असे म्हणत सोमय्यांनी राऊतांवर निशाणा साधला आहे.
१२०० कोटी रुपयांचा पत्रा चाळ घोटाळा असो. वसई नायगावमधील बिल्डरचा घोटाळा असो. महाविकास आघाडीचा महाराष्ट्रच लुटण्याचा उद्योग सुरू होता. माफियागिरी, दादागिरी करत प्रत्येकाला जेलमध्ये पाठवण्याची धमकी देण्यात येत होती. आता या सगळयाचा हिशोब माफिया संजय राऊत यांना हिशोब द्यावा लागणार, असे म्हणत सोमय्यांनी राऊतांवर टीका केली आहे.
ईडीकडून पाठवलेल्या समन्सला संजय राऊतांनी उत्तर दिलं नसल्याने आणि चौकशीत सहकार्य करत नसल्यानं ईडीचं पथक थेट त्यांच्या घरी पोहोचलं असल्याचं बोललं जात आहे. आठ अधिकाऱ्यांची टीम संजय राऊतांच्या घरी चौकशीसाठी पोहोचली आहे. आज दिवसभर ही चौकशी सुरु राहणार असल्याची माहिती आहे. दरम्यान, संजय राऊत यांच्यावर नेमकी काय कारवाई होणार याकडे लक्ष लागून आहे.
Read Also : जम्मू कश्मीरमध्ये दहशतवादी आणि सुरक्षा दलांत उडाली चकमक
ईडीच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की, संजय राऊत सहकार्य करत नसल्यानं त्यांची चौकशी करण्यासाठी हे पथक दाखल झाले आहे. याआधी राऊत यांना दोन वेळा समन्स दिले होते. आज त्यांची चौकशी करायची असे आदेश दिल्लीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून मिळाल्यानंतर हे पथक राऊतांच्या घरी दाखल झाले आहे. संजय राऊत यांच्यासह त्यांच्या पत्नीची देखील चौकशी होणार आहे.
Read Also : वेटलिफ्टिंगमध्ये बिंदयाराणी देवीने पटकावलं रौप्य पदक
पत्राचाळ जमीन घोटाळा (Patra Chawl Land Scam) 1,034 कोटी रुपयांचा आहे, असा आरोप करण्यात आला आहे. मुंबईमधील गोरेगाव येथील पत्राचाळीत महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरणाचा (म्हाडा) भूखंड आहे. ईडीच्या आरोपानुसार, प्रवीण राऊत यांच्या गुरू आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीला ही चाळ विकसित करण्याचे काम देण्यात आले होते. मात्र त्यांनी या जागेचा काही भाग खासगी बिल्डरांना विकला, असा आरोप आहे.
संजय राऊतांनी ट्वीट करत ईडी कारवाईचा निषेध केला आहे. “मी शिवसेना सोडणार नाही. ही खोटी कारवाई आहे. या प्रकरणातील पुरावे देखील खोटे आहेत. मी शिवसेना सोडणार नाही आणि मरेन पण शरण जाणार नाही.” असे ट्वीट राऊतांनी केले आहे.
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.