Sanjay Raut ।  पुढील 25 वर्ष भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्रामध्ये सत्ता मिळणार नाही, या वैफल्यातून आरोप सुरू आहेत - संजय राऊत

लवकरच मी या महाशयांचा टॉयलेट घोटाळा काढणार आहे, मिरा-भाईंदर महापालिकेत आणि इतरत्र काही कोटींचा टॉयलेट घोटाळा म्हणजे कुठे कुठे पैसे खातात विक्रांत पासून टॉयलेट पर्यत हे सगळे कागदपत्र सुपुर्द झालेले आहेत

Somaiyas Rs 100 crore toilet scam will be exposed say Sanjay Raut
सोमय्यांचा टॉयलेट घोटाळा बाहेर काढणार - राऊत  
थोडं पण कामाचं
  • लवकरच सोमय्यांचा टॉयलेट घोटाळा काढणार आहे - राऊत
  • मिरा-भाईंदर महापालिकेत आणि इतरत्र काही कोटींचा टॉयलेट घोटाळा म्हणजे कुठे कुठे पैसे खातात हे लक्षात येईल.
  • विक्रांत पासून टॉयलेट पर्यत हे सगळे कागदपत्र सुपुर्द झालेले आहेत

मुंबई :  न्याय व्यवस्थेत अशी काही व्यक्ती आहे. ते विशिष्ठ विचार धारेच्या आणि पक्षाच्या व्यक्तींना दिलासा देत आहे. त्यामुळे हा दिलासा घोटाळा आहे, अशा शब्दांत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी किरीट सोमय्या यांना INS विक्रांत निधी संकलन घोटाळ्यात मिळालेल्या दिलासावर टीका केली आहे. या संदर्भात संजय राऊत यांनी काल दिलासा घोटाळा असे ट्विट केले होते. (Somaiyas Rs 100 crore toilet scam will be exposed say Sanjay Raut)

प्रसार माध्यमांशी बोलताना राऊत म्हणाले,  न्यायालयाकडून दिलासा घोटाळा विशिष्ट राजकीय पक्षांच्या लोकांनाच दिलासा मिळत आहे.  विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांचे राइट हँड म्हणून ओळखले जाणारे भाजपचे आमदार संजय कुटे यांच्या संदर्भात एक बातमी वाचली त्यांनी त्यात म्हटले आहे की, ज्या गोष्टी आम्ही पोलीस किंवा प्रशासनाकडून करून घेऊ शकत नाही ते आम्ही न्यायालयाकडून करून घेतो न्यायालयात आमचं वजन आहे. आता हे कोणत्या प्रकारचे वजन आहे हे काल परवा दिसले आहे. 

गेल्या काही काळापासून सतत काही लोकांना दिलासा मिळत आहे. दिशा सालियन पासून मुंबई बँक घोटाळ्यापासून INS विक्रांत घोटाळा करणाऱ्या आरोपींपर्यंत एका रांगेत सगळ्यांना दिलासे कसे मिळतात, न्यायव्यवस्थेवर ती कोणाचा दबाव आहे का, न्यायव्यवस्थेवर विशेष असे लोक बसवण्यात आले आहेत का आणि ते कोणाचं सूचनेनुसार काम करतात का असाच सुरू राहिला तर देशाचे स्वतंत्र देशाची लोकशाही न्याय व्यवस्था धोक्यात येईल अशी चिंता राऊत यांनी व्यक्त केली. 

किरीट सोमय्या आज आणखी एक घोटाळा उघडकीस आणणार आहेत, यावर राऊत म्हणाले,  एखादा आरोपी जर पाकिस्तानमध्ये दाऊद इब्राहिम बरोबर बसला आणि तो महाराष्ट्रातील घोटाळे उघड करायला लागला तर त्याच्यावर कोण विश्वास ठेवणार, तो गुन्हेगार आहे.  दाऊद इब्राहिम ने जसे दहशतवादावर बोलू नये तसं आयएनएस विक्रांत सारख्या राष्ट्रीय प्रश्नांवर त्यांनी घोटाळा केलेला आहे, लोक भावनेशी खेळलेले आहेत आणि जे दिलासा घोटाळ्यातील मुक्त झालेले आहे. अशांवर लोक विश्वास ठेवणार नाही.  विक्रांत पैसा गोळा केला त्याचं काय केलं याचे उत्तर त्यांनी दिले पाहिजे. 

लवकरच मी या महाशयांचा टॉयलेट घोटाळा काढणार आहे मिरा-भाईंदर महापालिकेत आणि इतरत्र काही कोटींचा टॉयलेट घोटाळा म्हणजे कुठे कुठे पैसे खातात विक्रांत पासून टॉयलेट पर्यत हे सगळे कागदपत्र सुपुर्द झालेले आहेत युवा प्रतिष्ठान नावाचे जे काही एनजीओ चालत होते त्यांचे कुटुंब त्यांनी शेकडो कोटींचा टॉयलेट घोटाळा पर्यावरणाचा रास करून केलेले कोटींचे घोटाळे आता लवकरच बाहेर येईल, असे राऊत यांनी सांगितले. 

या सर्वांवर देवेंद्र फडणवीस यांनी बोलायला पाहिजे काल त्यांनी एकावर एक ट्विट केले त्यांची राष्ट्रभक्ती उचंबळून जात असते, काल त्यांनी माननीय पवार साहेब यांच्यावर ट्विट केलं एखादा त्यांनी आयएनएस विक्रांतवरती करावं, आम्ही काढणार आहोत,  शंभर कोटीच्या टॉयलेट घोटाळ्यावरही ट्वीट करावे, 
आता ते घाण करून ठेवलेल्या टॉयलेटमध्ये मधील पुरावे कुठे आहेत युवा प्रतिष्ठान श्रीमती सोमय्या आणि त्यांचं कुटुंब यांनी केलेला घोटाळा आहे, असा आरोप राऊत यांनी केला. 

विक्रांतवरती आपण उत्तर देऊ शकले नाहीत सत्र न्यायालयाने जे प्रश्न विचारलेत सत्र न्यायालय न्यायव्यवस्था आहे.  तुम्हाला जामीन नाकारताना सत्र न्यायालयाने तुमच्या वरती बेमानी असा ठपका ठेवला.  पैसे गोळा केले त्याचा हिशोब तुम्ही दिलेले नाहीत पैसे कुठे आहे माहिती नाही पुरावा काय मागताय,  राजभवन सांगते तुमचं पैसे जमा झाले नाहीत म्हणून अजून कसला पुरावा पाहिजे कोर्टाला.
बारा वर्षे तुम्ही पैसे हडप करून बसलात त्याच्यावर कागद लिहून दिलेला आहे त्याच्यावर गुन्हा दाखल झालेले लोकांची दिशाभूल करू नका, असे राऊत म्हणाले, 


आयएनएस घोटाळा सारखा टॉयलेट घोटाळा देखील आता दुर्गंध पसरवणारा आहे, आज तुम्ही विक्रांत घोटाळ्यातील आरोपींना प्रश्न विचारा टॉयलेट घोटाळा काय आहे
सरकार पडत नाही सरकार पडणार नाही किमान पुढले पंचवीस वर्ष राज्यात महाआघाडीचे सरकार कायम राहणार असा विश्वास राऊत यांनी व्यक्त केला. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी