Ranragini Tararani Teaser : रणरागिणी ताराराणीच्या भूमिकेत दिसणार Sonalee Kulkarni

मुंबई
भरत जाधव
Updated Mar 04, 2023 | 13:23 IST

Ranragini Tararani Teaser : मराठी अभिनेत्री (Marathi actress) सोनाली कुलकर्णी (Sonalee Kulkarni)सध्या विविध धाटणीच्या भूमिका साकारत प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे. अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आपल्या बहुचर्चित रणरागिणी ताराराणीची भूमिका साकारणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून चाहत्यांना या सिनेमाची उत्सुकता लागून होती. आता या सिनेमाचा रोमांचकारक टिझर (Teaser) भेटीला आला आहे.

Sonalee Kulkarni will be seen in the role of Ranragini Tararani
हर हर महादेवची ललकारी देणारी ताराराणी Teaser out  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • डॉ. जयसिंगराव पवार यांच्या 'मोगलमर्दिनी महाराणी ताराराणी' या ग्रंथावर आधारित आहे
  • राहुल जनार्दन जाधव हे 'मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणी' या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत.
  • चित्रपटाचा टिझर सोशल मीडियावर प्रदर्शित झाला आहे.

मुंबई :  मराठी अभिनेत्री (Marathi actress) सोनाली कुलकर्णी (Sonalee Kulkarni)सध्या विविध धाटणीच्या भूमिका साकारत प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे. अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आपल्या बहुचर्चित रणरागिणी ताराराणीची भूमिका साकारणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून चाहत्यांना या सिनेमाची उत्सुकता लागून होती. आता या सिनेमाचा रोमांचकारक टिझर (Teaser) भेटीला आला आहे. ( Sonalee Kulkarni will be seen in the role of Ranragini Tararani)

अधिक वाचा  :संजय दत्त नाही सोडू शकला तुरुंगातील ती सवय

हा चित्रपट डॉ. जयसिंगराव पवार यांच्या 'मोगलमर्दिनी महाराणी ताराराणी' या ग्रंथावर आधारित आहे. राहुल जनार्दन जाधव हे  'मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणी' या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. रणमर्दिनी, रणरागिनी महाराणी ताराबाई राजाराम भोसले म्हणजे स्त्रीनेतृत्वाचे सर्वोत्कृष्ट उदाहरण आहे. बिकट आणि क्लिष्ट परिस्थितीतही ज्यांनी उत्तम व्यवस्थापनाचे उदाहरण स्थापित केले यासोबत एक लेक, सून, पत्नी, माता तसेच राजस्त्री या भूमिकांमध्ये देखील आदर्श प्रस्थापित केले अशा अष्टपैलू स्त्रीचे जीवनचरित्र या चित्रपटातून सर्वांसमोर येणार आहे. 

अधिक वाचा  : श्री रामाच्या नावावर ठेवा आपल्या मुलाचं नाव

या चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण झाले असून चित्रपटाचा टिझर सोशल मीडियावर प्रदर्शित झाला आहे. प्लॅनेट मराठी, अक्षय विलास बर्दापूरकर आणि मंत्रा व्हिजन प्रस्तुत या चित्रपटाचे क्रिएटिव्ह व्हाईब आणि समीर अरोरा हे सिनेमाचे सहनिर्माते आहेत. या चित्रपटाची पटकथा आणि संवाद डॉ. सुधीर निकम यांनी लिहिली आहे. या चित्रपटाला सुप्रसिद्ध संगीतकार अवधुत गुप्ते यांनी संगीत दिले आहे.

अधिक वाचा  :पूर्ण आयुष्यभर याराना ठेवतात असे मित्र

चित्रपटाचे दिग्दर्शक राहुल जनार्दन जाधव यांनी चित्रपटाविषयी बोलताना सांगितले की,, " चित्रपट हे समाजप्रबोधनाचे आणि समाज जागरणाचे सर्वात प्रभावी माध्यम आहे. सध्याच्या आणि येणाऱ्या पिढ्यांवर चांगला प्रभाव पाडणारे, उत्कृष्ट वैयक्तिक आणि सामाजिक मूल्यांची स्थापना करणारे चित्रपट निर्माण होणे ही काळाची गरज आहे.  म्हणूनच प्रत्येक पिढीतील स्त्रियांना आदर्श वाटावे असे व्यक्तिमत्त्व पडद्यावर आणण्याचा प्रयत्न आम्ही या चित्रपटाद्वारे करत आहोत."

अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने आपल्या भूमिकेविषयी म्हणते, '' छत्रपती ताराराणी. मराठ्यांच्या स्वातंत्र्य युद्धातील एक रणरागिणी. त्यांचे कार्य, कर्तृत्व दैदिप्यमान आहे. अशा तडफदार व्यक्तिमत्वाची भूमिका साकारायला मिळणे ही माझ्यासाठी सन्मानाची आणि जबाबदारीची गोष्ट आहे.''

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी