मुंबईत भररस्त्यात कोरियन यूट्यूबरचा विनयभंग, 2 अटकेत

मुंबई
रोहन जुवेकर
Updated Dec 01, 2022 | 12:30 IST

south korean youtuber harassed in mumbai while live streaming 2 Arrested : मुंबईत खार येथे साऊथ कोरियन यूट्यूबर तरुणीसोबत दोन तरुणांनी गैरवर्तन केले. तरुणांनी भररस्त्यात तरुणीचा विनयभंग केला.

south korean youtuber harassed in mumbai while live streaming 2 Arrested
मुंबईत भररस्त्यात कोरियन यूट्यूबरचा विनयभंग  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • मुंबईत भररस्त्यात कोरियन यूट्यूबरचा विनयभंग
  • यूट्यूबरचा विनयभंग प्रकरणी 2 अटकेत
  • मुंबई पोलिसांची कारवाई

south korean youtuber harassed in mumbai while live streaming 2 Arrested : मुंबईत खार येथे साऊथ कोरियन यूट्यूबर तरुणीसोबत दोन तरुणांनी गैरवर्तन केले. तरुणांनी भररस्त्यात तरुणीचा विनयभंग केला. साऊथ कोरियन यूट्यूबर लाईव्ह स्ट्रिमिंग करत असताना हा प्रकार घडला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. खार पोलिसांनी या प्रकरणाची स्वतः दखल घेतली. यानंतर त्यांनी कलम 354 अंतर्गत गुन्हा दाखल केला. पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर चांद मोहम्मद (१९) आणि मोहम्मद नकीब अन्सारी (२०) या दोन आरोपींना कोरियन यूट्यूबरचा विनयभंग केल्याप्रकरणी अटक केली. 

साऊथ कोरियन यूट्यूबरचा विनयभंग मंगळवार 29 नोव्हेंबर 2022 रोजी झाला. ही घटना संध्याकाळी घडली. साऊथ कोरियन यूट्यूबर लाईव्ह स्ट्रिमिंग करत असताना हा प्रकार घडला. व्हिडीओत एक तरुण साऊथ कोरियन तरुणीच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. तरुणी त्याला विरोध करताना दिसत आहे. तरुण तिचा हात खेचताना दिसतो. तरुणीला वारंवार त्याच्या स्कूटरवर बसण्यास सांगताना दिसतो. तो तिच्या अतिशय जवळ जाऊन चुंबन घेण्याचा प्रयत्न करताना दिसतो. यानंतर तरुणी तिथून निघून जात असल्याचे दिसते. 

Radhakrishna Vikhe Patil : महाराष्ट्रात सक्तीचे धर्मांतरण सहन केले जाणारं नाही, गरज पडल्यास कायदा आणणार - राधाकृष्ण विखे पाटील 

Krishna Hegade । उद्धव ठाकरेंना आणखी धक्का; माजी आमदाराचा एकनाथ शिंदेंच्या गटाला पाठिंबा

अंगचटीला येणाऱ्या तरुणाला विरोध करत तरुणी तिथून निघते. आता मला घरी जावं लागेल, असं म्हणत तरुणी भरभर पावलं टाकताना दिसते. साऊथ कोरियन तरुणी निघून जात असताना आरोपी तरुण दुचाकीवरून तिचा पाठलाग करताना दिसतात. आमच्यासोबत चल असं म्हणत जबरदस्ती करताना दिसतात. तरुणी या स्थितीतून स्वतःची सुटका करून घेताना दिसते. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी कारवाई केली आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी