Special Block on Central Railway : डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोरसाठी मध्य रेल्वेवर विशेष ब्लॉक

मुंबई
रोहन जुवेकर
Updated Apr 15, 2023 | 11:40 IST

Special Block on Central Railway in Mumbai for Dedicated Freight Corridor : डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर अर्थात डीएफसी पुलासाठी मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर (मेन लाईन) कोपर ते ठाकुर्लीदरम्यान विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक आहे.

Special Block on Central Railway in Mumbai for Dedicated Freight Corridor
डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोरसाठी मध्य रेल्वेवर विशेष ब्लॉक  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोरसाठी मध्य रेल्वेवर विशेष ब्लॉक
  • मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरील (मेन लाईन) आजची शेवटची लोकल
  • मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरील (मेन लाईन) रविवार 16 एप्रिल 2023 रोजीची पहिली लोकल

Special Block on Central Railway in Mumbai for Dedicated Freight Corridor : डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर अर्थात डीएफसी पुलासाठी मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर (मेन लाईन) कोपर ते ठाकुर्लीदरम्यान विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक आहे. हा ब्लॉक असल्यामुळे रविवार 16 एप्रिल 2023 रोजी मध्यरात्री 12 वाजून 4 मिनिटांनी अंबरनाथला आणि मध्यरात्री 12 वाजून 24 मिनिटांनी कर्जतला जाणारी लोकल रद्द करण्यात आली आहे. 

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून कर्जत मार्गावरील शेवटची लोकल शनिवार 15 एप्रिल 2023 रोजी रात्री 11 वाजून 51 मिनिटांनी अंबरनाथला रवाना होईल. कसारा मार्गावरील शेवटच्या लोकलच्या वेळेत आणि गंतव्य स्थानात कोणताही बदल केलेला नाही. रविवार 16 एप्रिल 2023 रोजी मध्यरात्री दीड ते चार वाजेपर्यंत मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर (मेन लाईन) अप डाऊन स्लो (धीम्या) आणि फास्ट (जलद) तसेच पाचव्या आणि सहाव्या मार्गावर ब्लॉक घेण्यात येणार आहे. ब्लॉकमुळे शालीमार-एलटीटी, हावडा-एलटीटी, गोरखपूर-एलटीटी, आदिलाबाद-सीएसएमटी या एक्स्प्रेस वीस मिनिटे ते एक तास विलंबाने धावणार आहेत. भुवनेश्वर-एलटीटी, विशाखापट्टणम-सीएसएमटी, हैदराबाद-सीएसएमटी या मेल-एक्स्प्रेस कर्जत-पनवेल-दिवामार्गे मुंबईत दाखल होणार आहेत.

कपल्ससाठी मुंबईत फिरण्याचे BEST SPOTS

मुंबईतला राजवाडा आहे मुकेश अंबानींचे घर

मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरील (मेन लाईन) आजची शेवटची लोकल

  1. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अर्थात सीएसएमटी येथून शनिवार 15 एप्रिल 2023 रोजी रात्री 11 वाजून 51 मिनिटांनी अंबरनाथसाठी
  2. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अर्थात सीएसएमटी येथून रविवार 16 एप्रिल 2023 रोजी मध्यरात्री 12 वाजून 14 मिनिटांनी कसाऱ्यासाठी (कसारा)

मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरील (मेन लाईन) रविवार 16 एप्रिल 2023 रोजीची पहिली लोकल

  1. अंबरनाथहून पहाटे 4 वाजून 8 मिनिटांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अर्थात सीएसएमटीसाठी
  2. टिटवाळ्याहून पहाटे 3 वाजून 56 मिनिटांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अर्थात सीएसएमटीसाठी

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी