अनिल देशमुखांना घरचे जेवण नाकारणाऱ्या न्यायाधीशांची बदली

मुंबई
रोहन जुवेकर
Updated Nov 17, 2021 | 21:51 IST

special judge satbhai hearing anil deshmukh case transfer to yavatmal महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अनिल देशमुख यांना १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत घरचे जेवण नाकारणाऱ्या न्यायाधीश एच. एस. सातभाई यांची बदली करण्यात आली आहे.

special judge satbhai hearing anil deshmukh case transfer to yavatmal
अनिल देशमुखांना घरचे जेवण नाकारणाऱ्या न्यायाधीशांची बदली 
थोडं पण कामाचं
  • अनिल देशमुखांना घरचे जेवण नाकारणाऱ्या न्यायाधीशांची बदली
  • अनिल देशमुख यांना १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत घरचे जेवण नाकारणाऱ्या न्यायाधीश एच. एस. सातभाई यांची बदली
  • न्यायाधीश एच. एस. सातभाई यांची यवतमाळ जिल्ह्यातील केळापूर तालुका न्यायालयात बदली

special judge satbhai hearing anil deshmukh case transfer to yavatmal मुंबईः महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अनिल देशमुख यांना १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत घरचे जेवण नाकारणाऱ्या न्यायाधीश एच. एस. सातभाई यांची बदली करण्यात आली आहे. न्यायाधीश एच. एस. सातभाई यांची यवतमाळ जिल्ह्यातील केळापूर तालुका न्यायालयात बदली करण्यात आली आहे. एच. एस. सातभाई हे ‘प्रीव्हेंशन ऑफ मनी लाँड्रींग ॲक्ट’ अंतर्गत येणाऱ्या खटल्यांचे कामकाज मुंबईतील विशेष न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून बघत होते. 

सातभाई यांची बदली प्रशासकीय कारणांमुळे झाल्याचे सांगितले जात आहे. बदलीला उच्च न्यायालयाने १३ नोव्हेंबर रोजी संमती दिली होती. याआधी न्यायाधीश एच. एस. सातभाई यांच्या समोर राज्यातील बड्या राजकीय नेत्यांच्या प्रकरणांची सुनावणी झाली. यात महाराष्ट्र सदन घोटाळा हे एक मोठे प्रकरण होते. यात आरोपी असलेल्या छगन भुजबळ, समीर भुजबळ, पंकज भुजबळ आणि इतर यांची पुराव्यांअभावी निर्दोष मुक्तता झाली होती. सोमवारी सातभाई यांच्या न्यायालयात देशमुखांचे प्रकरण तसेच शिवसेना नेते आनंदराव अडसुळ यांचा अटकपूर्व जामीन आणि राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांचे भोसरी प्रकरण सुनावणीसाठी होते.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी