Central Railway : रेल्वेनं प्रवास करायचा आहे मग हे वाचा; Central Railway मार्गावर स्पेशल ट्राफिक ब्लॉक; गाड्यांच्या वेळापत्रकात बदल तर काही झाल्या रद्द

मुंबई
भरत जाधव
Updated May 26, 2022 | 13:33 IST

मध्य रेल्वे (Central Railway) मार्गावरुन लांब पल्ल्यांच्या गाड्यांनी प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्वाची बातमी आहे. या मार्गावरुन जर तुम्ही गावी जाण्याचा विचार करत असाल तर जरा थांबा  कारण या मार्गावरुन मार्गावर विशेष ट्रॅफिक ब्लॉक (special traffic block ) चालवण्यात आला आहे. त्यामुळे या कालावधीमध्ये अनेक लांब पल्ल्याच्या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. 

Special traffic block on Central Railway route
Central Railway मार्गावर स्पेशल ट्राफिक ब्लॉक  |  फोटो सौजन्य: Indiatimes
थोडं पण कामाचं
  • मध्य रेल्वे भुसावळ विभाग इगतपुरी (Bhusawal Division Igatpuri) येथील टिटोली यार्डमध्ये इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग साठी ब्लॉक
  • रेल्वे विभागाकडून यासंदर्भात ट्वीट करत देखील माहिती सांगण्यात आली आहे.

Central Railway : मध्य रेल्वे (Central Railway) मार्गावरुन लांब पल्ल्यांच्या गाड्यांनी प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्वाची बातमी आहे. या मार्गावरुन जर तुम्ही गावी जाण्याचा विचार करत असाल तर जरा थांबा  कारण या मार्गावरुन मार्गावर विशेष ट्रॅफिक ब्लॉक (special traffic block ) चालवण्यात आला आहे. त्यामुळे या कालावधीमध्ये अनेक लांब पल्ल्याच्या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. 

का करण्यात आलाय ब्लॉक

मध्य रेल्वे भुसावळ विभाग इगतपुरी (Bhusawal Division Igatpuri) येथील टिटोली यार्डमध्ये इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग सुरू करण्यासाठी 23 मे 2022 ते 31 मे 2022 या कालावधीत विशेष ट्रॅफिक ब्लॉक चालवण्यात येत आहे. या ब्लॉकमुळे या मार्गावरील काही रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. 
तर काही रेल्वेच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. याबाबत रेल्वे विभागाकडून माहिती देण्यात आली आहे. रेल्वे विभागाकडून यासंदर्भात ट्वीट करत देखील माहिती सांगण्यात आली आहे. विशेष ट्रॅफिक ब्लॉकमुळे काही रेल्वे रद्द तर काही रेल्वेच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे तो खालीलप्रमाणे….

मुंबई- मनमाड गाडी 6 दिवस रद्द –

02102/02101 मनमाड-मुंबई-मनमाड उन्हाळी विशेष रेल्वे 28 मे 2022 ते 02 जून 2022 (6 दिवस) पर्यंत रद्द असेल.
28 मे 2022 रोजी डाऊन मार्गावरील गाड्यांचे नियमन –
11059 लोकमान्य टिळक टर्मिनर्स – छपरा एक्स्प्रेस
11061 लोकमान्य टिळक टर्मिनर्स – जयनगर एक्स्प्रेस

28 मे 2022 रोजी येणार्‍या अप गाड्यांचे नियमन –

12072 जालना- मुंबई जनशताब्दी एक्स्प्रेस
12142 पाटलीपुत्र – लोकमान्य टिळक टर्मिनर्स एक्स्प्रेस
15065 गोरखपूर – पनवेल एक्स्प्रेस
12520 – कामाख्या – लोकमान्य टिळक टर्मिनर्स एक्स्प्रेस
15018 गोरखपूर- लोकमान्य टिळक टर्मिनर्स एक्स्प्रेस
12335 भागलपूर -लोकमान्य टिळक टर्मिनर्स एक्स्प्रेस

28 मे 2022 या गाड्यांचे रिशेड्युलिंग –

12141 लोकमान्य टिळक टर्मिनस- पाटलीपुत्र एक्स्प्रेस 28 मे 2022 लोकमान्य टिळक टर्मिनस येथून 29 मे 2022 रोजी 4.30 वाजता सुटेल
15066 पनवेल-गोरखपूर एक्स्प्रेस 28 मे 2022 रोजी त्याच दिवशी 18.30 वाजता पनवेलहून सुटेल
31 मे 2022 रोजी टिटोली यार्ड येथे 05.15 ते 11.15 पर्यंत विशेष ब्लॉक
विशेष ट्रॅफिक ब्लॉकमुळे काही रेल्वे रद्द तर काही रेल्वेच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे तो खालीलप्रमाणे….

या गाड्या रद्द –

12071 मुंबई-जालना जनशताब्दी एक्स्प्रेस 31 मे रोजी रद्द असेल.
12072 जालना-मुंबई जनशताब्दी एक्स्प्रेस 31 मे रोजी रद्द असेल.

31 मे 2022 रोजी गाड्यांचे पुनर्निर्धारित वेळापत्रक –

– लोकमान्य टिळक टर्मिनस येथून 10.55 वाजता सुटणारी 11059 छपरा एक्स्प्रेस 12.15 वाजता सुटेल.
– सीएसएमटीहून 11.05 वाजता सुटणारी 82356 मुंबई पटना एक्स्प्रेस 13.00 वाजता सुटेल.
– पनवेलहून सुटणारी 11061 गोरखपूर एक्स्प्रेस 15.50 वाजता 20.30 वाजता सुटेल.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी