मुंबई: मुख्यमंत्री शिंदेच्या (Chief Minister Shinde) सरकारला काहीच दिवस झाले आहेत. परंतु शिंदे सरकार या थोड्याच दिवसात लोकप्रिय होऊ लागलाय की काय असं वाटू लागलं आहे. याच कारण असं की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी जाहीर केलेली 75 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना (senior citizens) एसटीतून (ST) मोफत प्रवासाची सुविधेची (Free travel facility) घोषणा. सुरुवाताली या योजनेवरुन मुख्यमंत्री शिंदेची टिंगल उडवली गेली, परंतु या सुविधेचा फायदा लाखो म्हाताऱ्यांनी घेतलाय. यामुळे ज्येष्ठ नागरिकांचा मुख्यमंत्री शिंदेच्या या योजनेला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळू लागला आहे. या योजनेला ‘अमृत ज्येष्ठ नागरिक’ (Amrit Senior Citizen) असं नाव देण्यात आलं आहे. (Spontaneous response of the elderly to this scheme of Chief Minister Shinde)
75 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना एसटीतून (ST) मोफत प्रवासाची सुविधा जाहीर केली तेव्हा मुख्यमंत्र्यांवर टीकाही झाली. वयाचे 75 वर्ष पार केलेले नागरिक कोण एसटीने प्रवास करणार? असा सवाल मुख्यमंत्र्यांना करण्यात आला होता. मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयाची सोशल मीडियातून टिंगलटवाळीही झाली होती. मात्र, मुख्यमंत्र्यांच्या याच निर्णयाचे चांगले परिणामही दिसू लागले आहेत. या योजनेला ज्येष्ठांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळू लागला आहे. गेल्या चार दिवसांत 26 ते 29 ऑगस्ट दरम्यान राज्यभरातून सुमारे 1 लाख 51 हजारांहून अधिक ज्येष्ठ नागरिकांनी एसटीतून मोफत प्रवासाचा लाभ घेतला आहे. याची माहिती स्वत: एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी दिली.
Read Also : बलात्कारातील आरोपीने जेलमध्ये कापलं स्वत:च गुप्तांग
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 75 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना एसटीच्या सर्व सेवांमधून मोफत प्रवास तर 65 ते 75 वर्षादरम्यानच्या नागरिकांनाही सर्व सेवांमधून 50 टक्के सवलतीमध्ये प्रवास करता येईल, अशी घोषणा पावसाळी अधिवेशनात केली होती. 25 ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ज्येष्ठांना मोफत प्रवास योजनेसाठी प्रमाणपत्राचे वितरण आणि योजनेचा शुभारंभ झाला होता. त्यानंतर ज्येष्ठ नागरिकांचा 26 ऑगस्ट पासून मोफत प्रवासाला सुरुवात झाली होती. एसटी महामंडळाने या योजनेला ‘अमृत ज्येष्ठ नागरिक’ हे नाव दिले असून या योजनेतंर्गत ज्येष्ठ नागरिकांना महाराष्ट्राच्या हद्दीपर्यंत कुठेही मोफत प्रवास करता येणार आहे.
Read Also : मुस्लिम समाजा'ने 50 दलित कुटुबांना काढलं गावाबाहेर
प्रवासादरम्यान आधारकार्ड, पॅनकार्ड, वाहन परवाना, पारपत्र, निवडणूक ओळखपत्र तसेच केंद्र आणि राज्य शासनातर्फे निर्गमित केलेले ओळखपत्र यापैकी कुठलेही एक ओळखपत्र वाहकाला दाखविल्यास 75 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास करता येणार आहे, असे चन्ने म्हणाले.
दरम्यान, राज्य परिवहन महामंडळाकडे 34 लाख 88 हजार ज्येष्ठ नागरिकांनी स्मार्ट कार्डासाठी नोंदणी केली आहे. त्यापैकी 75 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांची संख्या 14 लाख 69 हजार आहे.
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.