SSC & HSC Exam : दहावी, बारावीची परीक्षेबाबत मोठी अपडेट, मंडळाने सुरू केली तयारी

ssc and hsc exam updates in marathi । दहावी आणि बारावीची परीक्षा ऑफलाईनच होणार आहे. त्यासाठी मंडळाने तयारीही सुरू केली आहे. मंडळाने १७ क्रमांकाच्या अर्ज भरणार्‍या विद्यार्थ्यांना मुदत वाढ दिली आहे.

Multibagger Stock
थोडं पण कामाचं
  • दहावी आणि बारावीची परीक्षा ऑफलाईन होणार आहे.
  • त्यासाठी मंडळाले तयारीही सुरू केली आहे.
  • मंडळाने १७ क्रमांकाच्या अर्ज भरणार्‍या विद्यार्थ्यांना मुदत वाढ दिली आहे.

SSC & HSC Exam : मुंबई : दहावी आणि बारावीची परीक्षा ऑफलाईनच होणार आहे. त्यासाठी मंडळाने तयारीही सुरू केली आहे. मंडळाने १७ क्रमांकाच्या अर्ज भरणार्‍या विद्यार्थ्यांना मुदत वाढ दिली आहे. राज्यात कोरोनाचे संकट वाढत आहे, त्यामुळे दहावी, बारावीच्या परीक्षा ऑफलाईन होतील असा अंदाज व्यक्त करण्यात येत होता. परंतु मंडळाने परीक्षेची तयारी सुरू केल्याने हा परीक्षा ऑफलाईनच होतील असे सांगण्यात येत आहे. (ssc and hsc exam will be offline maharashtra state board)

SSC And HSC Exam : दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी 'आनंदाची बातमी';  शिक्षण मंडळाने घेतला 'हा' महत्वपूर्ण निर्णय

दहावी आणि बारावीची परीक्षा घेण्यासाठी माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाने तयारी सुरू केली आहे. यापूर्वीच दोन्ही परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले होते. राज्य शिक्षण मंडळाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार ४ मार्चपासून बारावीची आणि १५ मार्चपासून दहावीची लेखी परीक्षा होणार आहे. २५ फेब्रुवारी ते १४ मार्च या कालावधीत दहावीच्या आणि १४ फेब्रुवारी ते ३ मार्च या कालावधीपर्यंत तोंडी (Oral) व प्रात्यक्षिक (Practical) परीक्षांची सुरुवात होणार आहे. तसेच १७ क्रमांकाचा फॉर्म भरून दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना मुदतवाढ देण्यात आली आहे. यासाठी १२ जानेवारी अखेर दिनांक असून विलंब शुल्क भरून विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज भरता येणार असल्याची मंडळाने दिली आहे. 

CBSE दहावी, बारावी टर्म १ च्या परीक्षांच्या निकालासंदर्भात ही महत्वाची बातमी

 मुंबई, ठाणे आदी महापालिका क्षेत्रांत दहावी-बारावीचे वर्ग आणि शाळा सुरू असल्या तरी येत्या काही दिवसांत कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटमुळे परिस्थिती बिघडण्याची भीती मंडळातील अधिकाऱ्यांनाही सतावत आहे. त्यामुळेच येत्या काही दिवसांत नऊ विभागीय मंडळांतील परिस्थितीचा आढावा घेतला जाणार आहे; मात्र या परीक्षांमध्ये बदल करण्याचा कोणताही विचार सध्या मंडळापुढे नसल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी