10th, 12th Class Exam : मुंबई : राज्य शिक्षण मंडळाच्या (State Board of Education) दहावीच्या (Class X) लेखी परीक्षा (Written test) या ऑफलाईनच (offline) होतील, त्यात कोणताही तुर्तास बदल होणार नसल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड (School Education Minister Varsha Gaikwad) यांनी आज दिली. त्यामुळे विद्यार्थ्यांनी दहावी-बारावीच्या परीक्षांचा अभ्यास आणि त्याची तयारी करावी असे आवाहनही त्यांनी राज्यातील विद्यार्थ्यांना केले. (Oral, practical and written exams of 10th-12th will be held offline only - Varsha Gaikwad)
राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागल्यानं शाळा बंद करण्यात आल्या होत्या. दरम्यान विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्यानं शाळा पुन्हा सुरू करण्याची मागणी केली जाऊ लागली आहे. राज्यातील इतर वर्ग जरी बंद करण्यात आले होते, तरी दहावी-बारावीचे वर्ग भरवले जात होते. मात्र कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे दहावी-बारावीची परीक्षा कशाप्रकारे घेतल्या जातील याविषयी प्रश्न उपस्थित केले जात होते.
राज्यातील काही विथ्यार्थी आणि पालक संघटनांकडून दहावी-बारावीच्या लेखी परीक्षा ऑनलाईन घेण्याची मागणी केली जात आहे. त्या पार्श्वभूमीवर विचारले असता गायकवाड म्हणाल्या की, कोरेोना आणि त्याचा प्रादुर्भाव राज्यात कमी होत असल्याने लवकरच शाळा सुरू केल्या जाणार आहेत. तर दुसरीकडे दहावी- बारावीच्या विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम पूर्ण होऊन त्यासाठीची तयारी करता यावी म्हणून शालेय शिक्षण विभागाकडून वेळोवेळी खबरदारी घेतली जात आहे. त्यामुळे या दोन्ही वर्गांच्या तोंडी, प्रात्यक्षिक आणि लेखी परीक्षा या ऑफलाईनच होतील, अशी माहितीही त्यांनी दिली.
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.