SSC HSC EXAM 2022 IMP UPDATE : दहावी बारावी परीक्षा ऑफलाइनच!

मुंबई
रोहन जुवेकर
Updated Jan 12, 2022 | 21:17 IST

SSC HSC EXAM 2022 WILL BE CONDUCTED ON OFFLINE MODE ONLY SAID BY MAHARASHTRA BOARD : महाराष्ट्रात यंदाच्या वर्षी (२०२२) दहावी आणि बारावीच्या परीक्षा परंपरागत पद्धतीने म्हणजेच ऑफलाइन पद्धतीने होतील; असे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने सांगण्यात आले.

SSC HSC EXAM 2022 WILL BE CONDUCTED ON OFFLINE MODE ONLY SAID BY MAHARASHTRA BOARD
दहावी बारावी परीक्षा ऑफलाइनच! 
थोडं पण कामाचं
  • दहावी बारावी परीक्षा ऑफलाइनच!
  • परीक्षा परंपरागत ऑफलाइन पद्धतीने आणि वेळापत्रकानुसारच होईल
  • दहावीची परीक्षा १५ मार्च आणि बारावीची परीक्षा ४ मार्चपासून सुरू होणार

SSC HSC EXAM 2022 WILL BE CONDUCTED ON OFFLINE MODE ONLY SAID BY MAHARASHTRA BOARD : मुंबई : महाराष्ट्रात यंदाच्या वर्षी (२०२२) दहावी आणि बारावीच्या परीक्षा परंपरागत पद्धतीने म्हणजेच ऑफलाइन पद्धतीने होतील; असे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने सांगण्यात आले. कोरोना संकटामुळे राज्यातील शाळा-कॉलेज १५ फेब्रुवारी २०२२ पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. मात्र परीक्षा परंपरागत ऑफलाइन पद्धतीने आणि वेळापत्रकानुसारच होईल; असे मंडळाच्यावतीने सांगण्यात आले. परिस्थिती पाहून काही बदल आवश्यक वाटल्यास केले जातील पण सध्या तरी असा कोणताही बदल करण्याबाबत निर्णय झाला नसल्याचे मंडळाच्यावतीने स्पष्ट करण्यात आले. 

याआधी २०२०-२१ या शैक्षणिक वर्षासाठी २०२१ मध्ये परीक्षा रद्द करुन मूल्यांकन करुन निकाल जाहीर करण्यात आला होता. नंतर २०२१-२२ हे शैक्षणिक वर्ष १५ जून २०२१ पासून सुरू झाले. जिथे कोरोना संकटाची तीव्रता जास्त होती तिथे ऑनलाइन आणि इतरत्र ऑफलाइन पद्धतीने शिक्षण सुरू होते. पण आता राज्यातील कोरोना रुग्ण वाढल्यामुळे शाळा-कॉलेज १५ फेब्रुवारी २०२२ पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय झाला. हा निर्णय झाला असला तरी दहावी आणि बारावीच्या २०२२ मध्ये होणार असलेल्या परीक्षा वेळापत्रकानुसार परंपरागत ऑफलाइन पद्धतीने होणार असल्याचे मंडळाच्यावतीने सांगण्यात आले.

जाहीर वेळापत्रकानुसार दहावीची परीक्षा १५ मार्च आणि बारावीची परीक्षा ४ मार्चपासून सुरू होणार आहे. तसेच प्रात्यक्षिक परीक्षा १४ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहेत. 

नववीतून २०२१च्या मूल्यांकनानंतर दहावीत गेलेल्यांची संख्या युडायस नोंदणीप्रमाणे १८ लाख ९५ हजार ३९८ होती. यातील इतर मंडळांचे सुमारे ९५ हजार विद्यार्थी वजा केले तरी १८ लाख विद्यार्थ्यांची नोंदणी दहावीच्या परीक्षेसाठी व्हायला हवी. पण १६ लाख १२ हजार विद्यार्थ्यांनीच दहावीच्या परीक्षेसाठी मंडळाकडे नोंदणी केली आहे. परीक्षेच्या आदल्या दिवसापर्यंत नोंदणीची परवानगी असल्यामुळे आणखी काही जण नोंदणी करतील असा अंदाज आहे. पण जे नोंदणी करणार नाहीत त्यांचे काय झाले ते शिक्षणापासून वंचित राहिल आहेत का याची तपासणी करण्याची मागणी होत आहे. बारावीसाठी आतापर्यंत १४ लाख ५२ हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी