SSC HSC Exam : बोर्डाचं कॉपीमुक्त अभियान, दहावी बारावी परीक्षेच्या केंद्राजवळील झेरॉक्स दुकानं ठेवणार बंद

मुंबई
भरत जाधव
Updated Feb 14, 2023 | 11:52 IST

Board's copy free campaign : दहावी, बारावी बोर्ड परीक्षेत कोणताही गैरप्रकार घडू नये यासाठी विशेष काळजी राज्य मंडळाकडून घेतली जात आहे. दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षा दरम्यान मोबाईलद्वारे किंवा अन्य माध्यमातून पेपरफुटी (paper leak) रोखण्यासाठी विविध पर्याय अवलंबले जात आहेत. त्यामुळे परीक्षा केंद्राजवळील 100 मीटर अंतरावर झेरॉक्स दुकाने बंद राहणार आहेत.

Board's copy free campaign; Xerox shops will be closed
कॉपीमुक्त परीक्षेसाठी केंद्राजवळील झेरॉक्स दुकानं ठेवणार बंद   |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
 • परीक्षा केंद्रातील 100 मीटरपर्यंतच्या परीसरात झेरॉक्स सेंटर बंद .
 • प्रत्येक तालुक्यामध्ये एक भरारी पथक असणार आहे.
 • परीक्षा केंद्राच्या बाहेर कॉपी पुरविणाऱ्यांचा घोळका असेल तर पोलिसांचा बंदोबस्त असेल.

SSC-HSC Exam : राज्य मंडळाच्या (State Board) दहावी-बारावी बोर्ड परीक्षेत (SSC-HSC Exam)मोठ्या प्रमाणात कॉपी होत असते. परीक्षेत (Exam) होणाऱ्या कॉपी प्रकरणाला आळा घालण्यासाठी मंडळाकडून कडक पावले उचलली जात आहेत. दहावी, बारावी बोर्ड परीक्षेत कोणताही गैरप्रकार घडू नये यासाठी विशेष काळजी राज्य मंडळाकडून घेतली जात आहे. दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षा दरम्यान मोबाईलद्वारे किंवा अन्य माध्यमातून पेपरफुटी (paper leak) रोखण्यासाठी विविध पर्याय अवलंबले जात आहेत. त्यामुळे परीक्षा केंद्राजवळील 100 मीटर अंतरावर झेरॉक्स दुकाने बंद राहणार आहेत.  (Board's copy free campaign;  Xerox shops will be closed near 10th and 12th examination centers) 

अधिक वाचा  : मुलं मुलीला भेटल्यानंतर सर्वात आधी बघतात या गोष्टी

कॉपीमुक्त अभियान राबविण्यासाठी परीक्षेच्या आधी परीक्षेदरम्यान आणि परीक्षेनंतर कोण कोणती कार्यवाही करावी या संदर्भात राज्यमंडळाने नुकतेच परिपत्रक जारी केले. कॉपीमुक्त परीक्षा व्हावी यासाठी प्रत्येक तालुक्यामध्ये एक भरारी पथक असणार आहे. तालुक्यांमध्ये केंद्राची संख्या जास्त असल्यास एक पेक्षा अधिक भरारी पथक दहावी-बारावी बोर्ड परीक्षा केंद्रावर जातील.

अधिक वाचा  : तुम्हाला परीक्षेत टॉपर व्हाययंच मग लावा या सवयी

परीक्षा काळात झेरॉक्स सेंटरवर विद्यार्थ्यांचा घोळका असतो. झेरॉक्स सेंटर्समधून मिनी कॉपी पुरवल्या जातात. असे कॉपीचे प्रकार रोखण्याकरता परीक्षा केंद्रातील 100 मीटरपर्यंतच्या परीसरात झेरॉक्स सेंटर बंद ठेवण्यात येतील. परीक्षा केंद्राच्या बाहेर कॉपी पुरविणाऱ्यांचा घोळका असेल तर त्यावर नियंत्रण आणण्यासाठी पोलिसांचा बंदोबस्त असणार आहे, परिणामी 144 कलम सुद्धा लागू करण्याची शक्यता आहे.  

 बोर्डाकडून विशेष काळजी

 • वेळेच्या दहा मिनिटे आधी प्रश्नपत्रिका दिली जाणार नाही. 
 • प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका वाटल्यानंतर परीक्षा केंद्रावर कुठल्याही विद्यार्थ्यांना प्रवेश नसेल. 
 • बोर्ड परीक्षा केंद्रावरील शंभर मीटर अंतरावर झेरॉक्स सर्व दुकाने बंद ठेवण्यात येतील.
 • प्रत्येक तालुक्यात भरारी पथक ही परीक्षा केंद्रावर जाऊन वेळोवेळी तपासणी करेल.
 • परीक्षा केंद्राच्या बाहेर कॉपी पुरविणाऱ्यांचा घोळका असेल तर त्यावर नियंत्रण आणण्यासाठी पोलिसांचा बंदोबस्त असेल. परिणामी 144 कलम सुद्धा लागू केला जाऊ शकतो. 
 • परीक्षेच्या प्रश्नपत्रिकांची चोरी करणे, प्रश्नपत्रिका मिळविणे, विकणे आणि विकत घेतल्यास किंवा मोबाईल अन्य इलेक्ट्रॉनिक्स माध्यमावर प्रसारित केल्यास परीक्षार्थी विद्यार्थ्याची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 
 • तसेच विद्यार्थ्यास पुढील पाच परीक्षांना प्रतिबंध (Rusticate) करण्यात येणार आहे.  शिवाय परीक्षार्थ्याविरुद्ध फौजदारी  गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. 

अशी होईल कारवाई 

 • बोर्डाच्या अधिकृत उत्तरपत्रिका, पुरवण्या, आलेख, नकाशे, लॉग टेबल, अनधिकृतपणे मिळवणे आणि वापर केल्यास पुढील एका परीक्षेस प्रतिबंध करण्यात येणार आहे. 
 • परीक्षेच्या प्रश्नपत्रिकांची चोरी करणे, मिळविणे, विकणे व विकत घेणे तसेच भ्रमणध्वनी व अन्य इलेक्ट्रॉनिक्स माध्यमावर प्रसारित केली तर पुढील पाच परीक्षांना प्रतिबंध करण्यात येणार आहे.
 • परीक्षार्थ्याविरुद्ध फौजदारी  गुन्हा दाखल होणार.
 • मंडळाने मान्यता न दिलेली अथवा प्रतिबंध केलेली साधने, साहित्य परीक्षा दालनात स्वत:जवळ बाळगणे वापरणे.
 • उत्तरपत्रिकेत-पुरवणीत प्रक्षोभक,अर्वाच्च्य भाषेचा वापर, शिवीगाळ लिहिणे किंवा धमक्या देणे, बैठक क्रमांक,फोन नंबर ,भ्रमणध्वनी क्रमांक देऊन संपर्क साधण्यास विनंती करणे.
 • विषयाशी संबधित नसलेला अन्य मजकूर लिहिणे, परीक्षा सुरू असताना इतर परीक्षार्थ्यांबरोबर उत्तराच्या संदर्भात गैरहेतूने संपर्क साधणे,एकमेकांचे पाहून लिहिणे, अन्य परीक्षार्थ्यांस तोंडी उत्तरे सांगणे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी