मुंबई : कोरोना संसर्गामुळे विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी फक्त एक महिन्याचा कालावधी मिळाला आहे, त्यामुळे दहावी आणि बारावीच्या ऑफलाइन परीक्षा पुढे ढकलाव्यात या मागणीसाठी राज्यभरात विविध ठिकाणी विद्यार्थ्यांनी आंदोलन केले. त्यात प्रामुख्याने मुंबईतील शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्या घराबाहेर आंदोलन करण्यात आले.
शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी काही दिवसांपूर्वी परीक्षा या ऑफलाईन स्वरूपात घेतल्या जातील असा निर्णय घेतलेला होता या निर्णयाच्या विरोधात विद्यार्थ्यांनी आज शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्या धारावीतल्या निवासस्थानाबाहेर आंदोलन केले..
औरंगाबाद:- औरंगाबाद शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांनी मोठे आंदोलन केले आहे, कोरोना संसर्गामुळे विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी फक्त एक महिन्याचा कालावधी मिळाला असून येत्या मार्च महिन्यामध्ये दहावी आणि बारावीची परीक्षा जाहीर करण्यात आली असून, मात्र विद्यार्थ्यांची परिपूर्ण तयारी झाली नसल्याने अनेक विद्यार्थ्यांच्या डोक्यात आत्महत्या सारखे प्रश्न येत आहे.
या संदर्भात राज्य शासनाने विचार करून दहावी-बारावीची परीक्षा पुढे ढकलण्यात यावी किंवा सदरील परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेण्यात यावे या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोठे आंदोलन केले आहे, यावेळी विद्यार्थ्यांनी राज्य शासनाच्या विरोधात घोषणाबाजीही केली.
मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा विचारा विद्यार्थ्यांनी आज रोजी दिला आहे, सदरील विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांना आज रोजी देण्यात आले आहे, अशी माहिती आज रोजी देण्यात आली आहे.
NANDED | ऑनलाईन परीक्षा घेण्यासाठी हजारो विद्यार्थी उतरले रस्त्यावर...
येता दहावी आणि बारावीच्या वार्षिक परीक्षा ऑनलाइन घेण्यात याव्या किंवा रद्द करण्यात याव्या यासाठी आज आयटीआय चौक येथे हजारो विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत राज्य शासनाने दहावी आणि बारावीच्या ऑफलाइन परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला असून त्यामध्ये विद्यार्थ्यांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होणार असून विद्यार्थ्यांनी आज दोन ते तीन महिने अभ्यासासाठी देण्यात यावेत अशा मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी यांना दिले
गेली दोन वर्षांपासून या सर्व विद्यार्थ्यांचे ऑनलाईन शिक्षण चालू होते या विद्यार्थ्यांना आता लेखी परीक्षा देणे अवघड जाणार असल्याने या सर्व विद्यार्थ्यांनी राज्य शासनाकडे मागणी केली आहे की दहावी आणि बारावीच्या ऑनलाइन परीक्षा घेण्यात यावा जेणेकरून ना विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही.
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.