SSC-HSC Exam : ऐकलं का ! दहावी-बारावीच्या परीक्षेसाठी शाळा विद्यार्थ्यांना करणार मदत, परीक्षेच्या तयारीसाठी पुढाकार

मुंबई
भरत जाधव
Updated Jan 16, 2022 | 12:38 IST

SSC-HSC Board Exam राज्यात कोरोनाचे (Corona) प्रमाण वाढल्यानं सरकारचं (government) टेन्शन वाढलं. संसर्ग अधिक होऊ नये, यासाठी ‘शाळा, महाविद्यालये (Colleges) बंद आणि ऑनलाइन शिक्षण (Online Education) सुरू ठेवा’, असा आदेश राज्य सरकारने (State Government)  काढला.

SSC-HSC Exam
दहावी-बारावीच्या परीक्षेसाठी शाळा विद्यार्थ्यांना करणार मदत  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • विद्यार्थ्यांचा अभ्यास कसा होणार या चिंतेत विद्यार्थ्यांसह शिक्षक पडले आहेत.
  • शाळांनी दहावी-बारावीच्या विद्यार्थ्याचा लेखन सराव, सराव परीक्षा, प्रात्यक्षिक परीक्षा, अशी तयारी सुरू ठेवली आहे.
  • प्रत्यक्ष शाळेत 80 ते 85 टक्के उपस्थित असणाऱ्या विद्यार्थ्यांचा हजेरीपट ऑनलाइन वर्ग सुरू झाल्यावर 20 ते 30 टक्क्यांपर्यंत घसरल्याचे निरीक्षण

पुणे :  राज्यात कोरोनाचे (Corona) प्रमाण वाढल्यानं सरकारचं (government) टेन्शन वाढलं. संसर्ग अधिक होऊ नये, यासाठी ‘शाळा, महाविद्यालये (Colleges) बंद आणि ऑनलाइन शिक्षण (Online Education) सुरू ठेवा’, असा आदेश राज्य सरकारने (State Government)  काढला. मात्र, दहावी-बारावीच्या बोर्डाची परीक्षा (SSC-HSC Board Exam ) तोंडावर आल्या आहेत. पुन्हा शाळा बंद म्हटल्यावर परीक्षेला (Exam) सामोरे कसे जायचे या प्रश्नामुळे शिक्षक (Teacher), विद्यार्थी (Student) पालकांचा (Parents) ‘टेन्शन’ वाढले आहे. 

विद्यार्थ्यांचा अभ्यास कसा होणार या चिंतेत विद्यार्थ्यांसह शिक्षक पडले आहेत.  यावर मार्ग काढण्यासाठी आता शाळा पुढाकार घेत असल्याचे दिसून येते. शाळांनी दहावी-बारावीच्या विद्यार्थ्याचा लेखन सराव, सराव परीक्षा, प्रात्यक्षिक परीक्षा, अशी तयारी सुरू ठेवली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांकडून परीक्षेची तयारी करून घेणे शक्य होत असल्याचे शिक्षकांचे म्हणणे आहे. लॉकडाऊनच्या काळात विद्यार्थ्यांना लेखन सराव राहिलेला नाही. शुद्धलेखनाच्या समस्या अधिक येत असल्याने शाळा सरव पेपर घेणार आहेत. 

‘शाळा, महाविद्यालये बंद’ करण्याचा राज्य सरकारचा आदेश म्हटल्यावर शिक्षण संस्थांना त्यांची अंमलबजावणी करण्याचे बंधन आले. शाळा बंद ठेवण्यात आल्या आणि ऑनलाइन शिक्षण पुन्हा सुरू झाले. दरम्यान, प्रत्यक्ष शाळेत 80 ते 85 टक्के उपस्थित असणाऱ्या विद्यार्थ्यांचा हजेरीपट ऑनलाइन वर्ग सुरू झाल्यावर 20 ते 30 टक्क्यांपर्यंत घसरल्याचे निरीक्षणही शिक्षकांनी नोंदविले आहे.

शाळांमध्ये सध्या दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांची तयारी करून घेण्यात येत आहे. मुख्याध्यापक महामंडळाचे राज्य प्रवक्ते महेंद्र गणपुले म्हणाले,‘‘विविध शैक्षणिक बोर्डांकडून दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी राबवायचे उपक्रम सुरू राहतील, असे राज्य सरकारच्या आदेशात म्हटले आहे. त्यामुळे दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांचा लेखनाचा कमी झालेला सराव भरून काढण्यासाठी शाळांमध्ये पूर्व परीक्षा, सराव परीक्षा आयोजित केल्या जात आहेत. तसेच लेखनातील दोष विद्यार्थ्यांना सांगून योग्य मार्गदर्शन केले जात आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी