SSC HSC pre exam : महाराष्ट्रात १ फेब्रुवारीपासून दहावी बारावीची पूर्व परीक्षा

मुंबई
रोहन जुवेकर
Updated Jan 08, 2022 | 20:33 IST

SSC HSC pre exam from 1st February 2022 in Maharashtra : महाराष्ट्रात १ फेब्रुवारीपासून दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांची पूर्व परीक्षा सुरू होत आहे. तसेच १ फेब्रुवारीपासून राज्यातील अनेक शाळांच्या पाचवी ते नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांच्या दुसऱ्या चाचणी परीक्षेला सुरुवात होत आहे. 

SSC HSC pre exam from 1st February 2022 in Maharashtra
महाराष्ट्रात १ फेब्रुवारीपासून दहावी बारावीची पूर्व परीक्षा 
थोडं पण कामाचं
  • महाराष्ट्रात १ फेब्रुवारीपासून दहावी बारावीची पूर्व परीक्षा
  • १ फेब्रुवारीपासून राज्यातील अनेक शाळांच्या पाचवी ते नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांच्या दुसऱ्या चाचणी परीक्षेला सुरुवात
  • कोविड प्रोटोकॉलचे पालन करुन परीक्षांचे आयोजन

SSC HSC pre exam from 1st February 2022 in Maharashtra : मुंबई : महाराष्ट्रात १ फेब्रुवारीपासून दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांची पूर्व परीक्षा सुरू होत आहे. तसेच १ फेब्रुवारीपासून राज्यातील अनेक शाळांच्या पाचवी ते नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांच्या दुसऱ्या चाचणी परीक्षेला सुरुवात होत आहे. 

कोविड प्रोटोकॉलचे पालन करुन परीक्षांचे आयोजन केले जाईल. परीक्षांबाबतची सविस्तर माहिती विद्यार्थ्यांना त्यांच्या शाळेकडून मिळेल. फेब्रुवारी महिन्यात होणार असलेल्या सर्व परीक्षांचे निकाल फेब्रुवारी महिन्यातच जाहीर केले जातील. 

महाराष्ट्रात दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांची बोर्डाची परीक्षा मार्च २०२२ मध्ये होणार आहे. दहावीची बोर्डाची परीक्षा १५ मार्च २०२२ आणि बारावीची बोर्डाची परीक्षा ४ मार्च २०२२ पासून सुरू होत आहे.

विद्यार्थ्यांचे लसीकरण

देशभर १५ ते १८ वयोगटातील मुलांचे कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरू आहे. पात्र मुलांनी लस टोचून घ्यावी असे आवाहन शाळांकडून करण्यात आले आहे. अनेक शाळांनी पालकांशी समन्वय साधून विद्यार्थ्यांचे लसीकरण लवकर करुन घेण्यासाठी नियोजन केले आहे. आतापर्यंत भारतातील २ कोटी ४४ लाख २९ हजार १७२ विद्यार्थ्यांनी (१५ ते १८ वयोगट) लसचा पहिला डोस घेतला आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी