SSC-HSC Result 2022 Date Update : दहावी आणि बारावीच्या निकालाबाबत शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांची मोठी घोषणा 

10th and 12th Board Result Date Update : दहावी आणि बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा कधी लागणार हा पालक आणि विद्यार्थ्यांना भेडसावणाऱ्या प्रश्नावर राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी मोठी घोषणा केली आहे.  

Breaking News
दहावी आणि बारावीच्या निकालाबाबत शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांची मोठी घोषणा   |  फोटो सौजन्य: Times Now

शिर्डी :  दहावी आणि बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा कधी लागणार हा पालक आणि विद्यार्थ्यांना भेडसावणाऱ्या प्रश्नावर राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी मोठी घोषणा केली आहे.  बारावीच्या परीक्षेचा निकाल पुढील आठवड्यात लागणार असून त्याच्या पंधरा दिवसानंतर दहावीच्या परीक्षेचा निकाल लागणार असल्याची माहिती गायकवाड यांनी दिली आहे. 

शिर्डीतील काँग्रेसच्या आयोजित नवसंकल्प कार्यशाळेत पत्रकारांशी बोलताना वर्षा गायकवाड यांनी ही माहिती दिली. दहावी आणि बारावीच्या निकालासंदर्भात मला अनेक पालक आणि विद्यार्थ्यांचे मेसेज आले आहे. ताई निकाल कधी लागणार. मी त्या पालक आणि विद्यार्थ्यांना सांगू इच्छिते की पुढील आठवड्यात १२ वीचा निकाल लागण्याची शक्यता आहे. सर्व तयारी झाली की आम्ही या संदर्भात पत्रकार परिषद घेऊन माहिती देणार आहोत. तसेच बारावी परीक्षेचा निकाल लागल्यावर त्याच्या पंधरा दिवसांनंतर दहावीचा निकाल लावला जाईल असेही गायकवाड यांनी सांगितले. 

गेल्या अनेक दिवसांपासून पालक आणि विद्यार्थी दहावी आणि बारावीच्या निकालाची वाट पाहत आहे. त्यांनाही या संदर्भात उत्सुकता आहे. बोर्डाचे काम आता अंतीम टप्प्यात आहे. येत्या काळात पत्रकार परिषद घेतली जाईल आणि योग्य ती माहिती देण्यात येईल असेही गायकवाड म्हणाल्या. 

पाहा नेमक्या काय म्हणाल्या वर्षा गायकवाड 

 
Live - शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांची पत्रकार परिषद Live - शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांची पत्रकार परिषद Posted by RNO - Right News Online on Wednesday, June 1, 2022

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी