SSC result 2020: दहावीचा निकाल जाहीर, असे मिळाले रद्द झालेल्या भूगोल पेपरचे गुण!

मुंबई
Updated Jul 29, 2020 | 14:09 IST | टाइम्स नाऊ मराठी

mahasscresult.nic.in 2020: महाराष्ट्र बोर्डाचा दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेचा शेवटचा भूगोलाचा पेपर कोरोना साथीमुळे रद्द करण्यात आला होता. पण आता या पेपरचे गुण नेमके कसे दिले आहेत हे स्पष्ट झालं आहे.

ssc result
भूगोलाच्या पेपरचे मार्क 'असे' मिळणार! (फोटो सौजन्य: iStock Images) 

थोडं पण कामाचं

  • दहावीचा निकाल कधी लागणार याकडे सर्व विद्यार्थी आणि पालकांचे लक्ष
  • दहावीची परीक्षा ३ मार्च २०२० ला सुरू झाली होती.
  • कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे २३ मार्चला होणारा भूगोलाचा पेपर अखेर रद्द करण्यात आला.

मुंबई: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाकडून (MSBSHSE) घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल आज (२९ जुलै २०२०) जाहीर करण्यात आला आहे. बोर्डाने पत्रकार परिषद घेत हा निकाल जाहीर केला. यंदा राज्याचा निकाल तब्बल ९५.३० टक्के इतका लागला आहे. विद्यार्थ्यांना आपला निकाल ऑनलाइन पाहता येत आहे. हा निकाल mahresult.nic.in या अधिकृत वेबसाइटवर ऑनलाइन पाहता येणार आहे.

दरम्यान, यंदा दहावीच्या परीक्षेत एक वेगळीच घटना घडली. यावेळी कोरोना साथीमुळे शेवटचा पेपर रद्द करावा लागला होता. पण त्यामुळे या पेपरचे गुण नेमके मिळणार कसे? याबाबत विद्यार्थ्यांना चिंता लागून राहिली होती. मात्र आता निकाल लागल्यानंतर विद्यार्थ्यांना नेमके कसे गुण देण्यात आले आहेत हे बोर्डाकडून स्पष्ट केलं गेलं आहे. 

रद्द झालेल्या भूगोल पेपरचे गुण असे मिळाले! 

दरम्यान, केवळ भूगोलाचा पेपर रद्द झाल्याने शिक्षण मंडळ विद्यार्थ्याला इतर पेपरमधील गुणांच्या सरासरीनुसार भूगोलाचे मार्क दिले आहेत. रद्द झालेल्या पेपरबाबतचे नोटीस MSBSHSEकडून जाहीर करण्यात आली होती. तसेच ९ वी आणि अकरावीमध्ये नापास झालेल्या विद्यार्थ्यांनाही पुन्हा एकदा संधी देण्याचा निर्णय महाराष्ट्र बोर्डाने घेतला आहे. 

 

दरम्यान, दहावीचा ऑनलाइन निकाल (SSC result 2020 Date) आज दुपारी १ वाजता जाहीर केला गेला. कोरोना व्हायरसच्या संसर्गामुळे दहावी आणि बारावीचा निकाल यंदा उशिराने जाहीर करण्यात आला आहे. एरव्ही बारावीचा निकाल मे महिन्याच्या अखेरीस तर दहावीचा निकाल जूनच्या पहिल्या आठवड्यात जाहीर केला जातो. मात्र यंदा कोरोनामुळे सर्वच निकाल लांबणीवर पडले आहेत. महाराष्ट्र बोर्डाने दहावीचा निकाल ऑनलाइन जाहीर केला असून विद्यार्थी www.maharashtraeducation.com आणि www.examresults.net/maharashtra या अधिकृत वेबसाइटवर पाहू शकतात. यात विद्यार्थ्यांना आपला रोल नंबर आणि आईचे नाव टाकायचे आहे. त्यानंतर ते ऑनलाईन निकाल पाहू शकतील. 


११वी ऑनलाईनचे प्रवेश वेळापत्रक

  •  २२ जुलै - २२ जुलैपर्यंत उच्च माध्यमिक शाळा / कनिष्ठ महाविद्यालयांनी वेबसाईटवर नोंदणी करणे गरजेचे
  •  २४ जुलै - च्च माध्यमिक शाळा / कनिष्ठ महाविद्यालयांनी भरलेल्या माहितीची विभागीय शिक्षण उपसंचालकांकडून ऑनलाईन पडताळणी 
  • २६ जुलैपासून - अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेला ऑनलाईन सुरूवात. विद्यार्थी ऑनलाईन नोंदणी करु शकतात. सुरूवातीला अर्जाचा पहिला भाग भरणे आणि मार्गदर्शन केंद्र निवडणे. 
  • २७ जुलैपासून - अर्जाची तपासणी आणि व्हेरिफिकेशन 
  • अर्जाचा दुसरा भाग दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर केल्यानंतर भरावा लागेल. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी