SSC Result 2022: दहावीच्या बोर्डाच्या निकालबाबत आली आहे मोठी ताजी अपडेट 

Maharashtra SSC Result 2022: राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत बारावीचा निकाल जाहीर करण्यात आल्यानंतर काही दिवसात दहावीचा निकाल लागतो. आता या निकालाकडे सर्व विद्यार्थी आणि पालकांची नजर आहे.  महाराष्ट्र बोर्डाचे १६ लाखांहून अधिक विद्यार्थी दहावीच्या निकालाच्या प्रतीक्षेत आहेत. बोर्डाने उत्तरपत्रिका तपासणीची प्रक्रिया जवळपास पूर्ण झाली आहे.  त्यामुळे येत्या आठवडाभरात निकालही जाहीर केला जाईल. हा निकाल ऑनलाइन पद्धतीने जाहीर करण्यात येईल. ऑफलाइन निकाल हा म्हणजे मार्कशीट १० दिवसांनी सं

ssc result 2022 10th result will be released in a few days read full story in marathi
दहावीच्या बोर्डाच्या निकालबाबत आली आहे मोठी ताजी अपडेट  
थोडं पण कामाचं
  • बारावीनंतर दहावीच्या निकालाची प्रतीक्षा
  • १५ जूनपर्यंत निकाल जाहीर होण्याची शक्यता
  • अधिकृत वेबसाइटवर मिळेल सविस्तर अपडेट

Maharashtra SSC Result 2022 Date updates: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education, MSBSHSE)बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना आता दहावीच्या निकालाची प्रतीक्षा आहे. महाराष्ट्र बोर्डाचा दहावीचा निकाल कधी लागणार? याबद्दल प्रश्न विचारले जात आहेत. दरम्यान दहवीच्या परीक्षेत बसलेले विद्यार्थी mahresult.nic.in आणि mahahsscboard.in या अधिकृत वेबसाइटवर ऑनलाइन मार्कशीट पाहू शकणार आहात. 

महाराष्ट्र बोर्डाने  काल म्हणजे ८ जून रोजी बारावीचा निकाल जाहीर केला आहे. दहावीची पेपर चेकिंगची प्रक्रिया पूर्ण झाली आहे.  आता राज्यसभेची निवडणुकीनंतर एक ते दोन दिवसांनंतर  शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी हिरवा कंदील दिल्यावर पुढील आठवड्यापर्यंत निकाल जाहीर होणार असल्याची माहिती मंडळाच्या अधिकाऱ्याने दिली होती. 
निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांना रोल नंबर आणि आईचे नाव टाकावे लागेल. दहावीचा निकाल १५ जून रोजी जाहीर होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. दरम्यान विद्यार्थ्यांनी ऑफिशियल माहितीसाठी मंडळाची वेबसाइट पाहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. तसेच शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड लवकरच यासंदर्भात घोषणा करतील.

यंदा १६ लाख विद्यार्थ्यांचे भवितव्य ठरणार 

महाराष्ट्र बोर्डाचे १६ लाखांहून अधिक विद्यार्थीचे डोळे दहावीच्या निकालाकडे लागून राहिले आहे.  बोर्डाने उत्तरपत्रिका तपासण्याची प्रक्रिया जवळपास पूर्ण केली  आहे. त्यामुळे पुढील काही दिवसात काही तांत्रिक बाबी पूर्ण करून निकालही जाहीर केला जाईल. हा निकाल ऑनलाइन पद्धतीने जाहीर करण्यात येईल. महाराष्ट्र बोर्डाची दहावीची परीक्षा मार्च २०२२ मध्ये झाली. काही दिवसांपूर्वीच बोर्डाने बारावी परीक्षेचा निकाल जाहीर केला.

गेल्या वर्षी इतका लागला होता निकाल 

परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी विद्यार्थ्यांना किमान ३५ टक्के गुण मिळणे आवश्यक आहे. गेल्यावर्षी दहावीचा म्हणजेच महाराष्ट्र बोर्डाचा दहावीचा निकाल १६ जुलै रोजी जाहीर झाला होता. २०२१ च्या दहावी परीक्षेत साधारण १५.७४ लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. परीक्षेत एकूण ९९.९५ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यंदाही परीक्षेचा निकाल चांगला लागेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

अकरावीच्या प्रवेशाची प्रक्रिया जोरात 

दहावीच्या निकालानंतर अकरावीला प्रवेश घेणाची प्रक्रिया जोरात सुरू होते.  हे लक्षात घेत शिक्षण संचालनालयाने अकरावीचे प्रवेश अर्ज भरण्याची ऑनलाइन प्रक्रिया सुरू केली असून, नोंदणीसह अर्जाचा पहिला भाग भरण्यास सुरुवात झाली आहे. दहावीचा निकाल लागल्यानंतर अर्जाचा दुसरा भाग भरण्यास सुरुवात होणार असल्याचे शिक्षण संचालनालयामार्फत जाहीर करण्यात आले होते. जूनच्या तिसऱ्या आठवड्यात दहावीचा निकाल जाहीर होणार असल्यामुळे अर्जाचा भाग दोन भरण्याची प्रक्रिया याच आठवड्यात सुरू होणार आहे. त्यामुळे जुलै महिन्यापासून अकरावीच्या प्रवेश फेऱ्यांचे नियोजन जाहीर केले जाऊ शकते.
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी