SSC Result 2022 MSBSHSE 10th Result: दहावी (SSC) बोर्डाचा निकाल आज दुपारी १ वाजता होणार जाहीर 

Maharashtra SSC Result 2022 MSBSHSE 10th Result:   महाराष्ट्र राज्य बोर्ड आणि उच्च माध्यमिक शिक्षण (MHBHSE) आज 17 जूनच्या रोजी 10वीचा निकाल जाहीर होणार आहे. दुपारी १ वाजता निकाल जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती काल शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली. निकाल जाहीर झाल्यानंतर, विद्यार्थी महाराष्ट्र बोर्डाच्या  http://sscresult.mkcl.org  किंवा maharesult.nic.in किंवा https://ssc.mahresults.org.in   या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन त्यांचा निकाल पाहू शकतील.

SSC Result 2022 MSBSHSE 10th Maharashtra board Result to be declared today at 1pm check www.maharesult.nic.in
दहावी (SSC) बोर्डाचा निकाल आज दुपारी १ वाजता होणार जाहीर   |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • महाराष्ट्र बोर्डाचा दहावीचा निकाल आज दुपारी १ वाजता जाहीर होणार
  •  ही परीक्षा १५ मार्च ते ४ एप्रिल  2022 या कालावधीत घेण्यात आली होती.
  •  या संदर्भातील माहिती काल शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली.

Maharashtra SSC Result 2022, MSBSHSE 10th Result, www.maharesult.nic.in :  महाराष्ट्र बोर्ड 10वी च्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची माहिती आहे. महाराष्ट्र राज्य मंडळ आणि उच्च माध्यमिक शिक्षण (MSBSHSE)मंडळाचा आज दुपारी १ वाजता 10वीचा निकाल जाहीर होणार आहे.  या संदर्भातील माहिती काल शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली. यापूर्वी माध्यमांशी संवाद साधताना बोर्डाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, महाराष्ट्र राज्य मंडळाने प्रतींचे मूल्यांकन पूर्ण केले असून विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका साइटवर अपलोड करण्याचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. त्यामुळे आज पालक आणि विद्यार्थ्यांची प्रतिक्षा संपणार आहे. (SSC Result 2022 MSBSHSE 10th Maharashtra board Result to be declared today at 1pm check www.maharesult.nic.in)
 
 महाराष्ट्रात एसएससीच्या परीक्षा १५ मार्च ते ४ एप्रिल या कालावधीत झाल्या. यावर्षी MSBSHSE ने इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी दोन वर्षांनी ऑफलाइन परीक्षा घेतली.
 

निकाल बघण्यासाठी....
  

  1. http://mahresult.nic.in

  2. http://sscresult.mkcl.org

  3. https://ssc.mahresults.org.in

महाराष्ट्र बोर्डाचे सर्व SSC विद्यार्थी निकाल तपासण्यासाठी खालील स्टेप्स फॉलो करू शकतात

महाराष्ट्र SSC चा निकाल 2022 कसा तपासायचा :

  1. सर्वप्रथम महाराष्ट्र बोर्डाच्या अधिकृत वेबसाईट mahresult.nic.in ला भेट द्या.
  2. आता मुख्यपृष्ठावरील 'महाराष्ट्र एसएससी निकाल 2022' या पर्यायावर क्लिक करा.
  3. तुमची लॉगिन क्रेडेंशियल्स जसे की रोल नंबर इत्यादी एंटर करा आणि सबमिट करा
  4. तुमचा निकाल स्क्रीनवर दिसेल.
  5. भविष्यातील वापरासाठी ते डाउनलोड करा आणि त्याची प्रिंट आउट देखील घ्या.
     

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी