SSC Result 2022, MSBSHSE SSC Exam Result 2022, महाराष्ट्रात दहावीचा ऑनलाईन निकाल शुक्रवार १७ जून रोजी दुपारी १ वाजता

मुंबई
रोहन जुवेकर
Updated Jun 16, 2022 | 20:41 IST

SSC Result 2022, MSBSHSE SSC Exam Result 2022 Date Time Declared, How to view SSC Result 2022  : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च-एप्रिल २०२२ मध्ये आयोजित करण्यात आलेल्या माध्यमिक शालांत (इ.१० वी) परीक्षेचा निकाल शुक्रवार १७ जून २०२२ रोजी दुपारी एक वाजता ऑनलाईन जाहीर होईल.

SSC Result 2022, MSBSHSE SSC Exam Result 2022
महाराष्ट्रात दहावीचा ऑनलाईन निकाल शुक्रवार १७ जून रोजी दुपारी १ वाजता  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • महाराष्ट्रात दहावीचा ऑनलाईन निकाल शुक्रवार १७ जून रोजी दुपारी १ वाजता
  • दहावीच्या मार्च-एप्रिल २०२२च्या परीक्षेला १६,३८,९६४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली
  • ऑनलाईन निकालानंतर गुणपडताळणी करता येणार

SSC Result 2022, MSBSHSE SSC Exam Result 2022 Date Time Declared, How to view SSC Result 2022  : मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च-एप्रिल २०२२ मध्ये आयोजित करण्यात आलेल्या माध्यमिक शालांत (इ.१० वी) परीक्षेचा निकाल शुक्रवार १७ जून २०२२ रोजी दुपारी एक वाजता ऑनलाईन जाहीर होईल.

दहावीच्या मार्च-एप्रिल २०२२च्या परीक्षेला १६,३८,९६४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यापैकी ८,८९,५०६ मुलगे असून मुलींची संख्या ७,४९,४५८ एवढी आहे.

ऑनलाईन निकालानंतर गुणपडताळणी, उत्तरपत्रिकांच्या छायांकित प्रती, पुनर्मूल्यांकन व स्थलांतर प्रमाणपत्रासाठी ऑनलाईन अर्ज स्विकारण्यात येतील. याबाबतची सविस्तर माहिती,अटी,शर्ती http://verification.mh-ssc.ac.in या संकेतस्थळावर उपलब्ध.

निकाल बघण्यासाठी....

1. http://mahresult.nic.in
2. http://sscresult.mkcl.org 
3. https://ssc.mahresults.org.in  

महाराष्ट्र SSC चा निकाल 2022 कसा तपासायचा :

  1. सर्वप्रथम महाराष्ट्र बोर्डाच्या अधिकृत वेबसाईट mahresult.nic.in ला भेट द्या.
  2. आता मुख्यपृष्ठावरील 'महाराष्ट्र एसएससी निकाल 2022' या पर्यायावर क्लिक करा.
  3. तुमची लॉगिन क्रेडेंशियल्स जसे की रोल नंबर इत्यादी एंटर करा आणि सबमिट करा
  4. तुमचा निकाल स्क्रीनवर दिसेल.
  5. भविष्यातील वापरासाठी ते डाउनलोड करा आणि त्याची प्रिंट आउट देखील घ्या.

महाराष्ट्र SSC चा निकाल 2022 SMS वर कसा तपासायचा :

प्रचंड ट्रॅफिकमुळे महाराष्ट्र बोर्डाची अधिकृत वेबसाइट निकाल जाहीर झाल्यानंतर क्रॅश होऊ शकते. अशा परिस्थितीत विद्यार्थी त्यांच्या मोबाईलवरील एसएमएस अॅप्लिकेशनवरूनही निकाल पाहू शकतात. महाराष्ट्र SSC 2022 चा निकाल एसएमएसद्वारे देखील पाहण्यासाठी, 'MHSSC' <तुमचा सीट नंबर> टाइप करा आणि 57766 वर पाठवा. काही वेळातच तुमचा निकाल मोबाईल नंबरवर येईल.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी