पुणे : एसटी कर्मचाऱ्यांसाठी (ST employees ) मोठी बातमी आहे. मुख्यमंत्री (Chief Minister) एकनाथ शिंदे (Eknath Shinde) एसटी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता (Dearness Allowance) देणार असून तशा सूचनाही जारी करण्यात आल्या आहेत. एसटी कामगार संघटनेच्या (ST Labor Union) बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सूचना दिल्या. महागाई भत्ता देण्याचं आश्वासन देण्यात आलं असल्याची माहिती एसटी कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे यांनी दिली. त्यामुळे हजारो एसटी कर्मचाऱ्यांना मोठा दिलाास मिळणार आहे. तसंच वाढत्या महागाईत आर्थिक मदतीचा हातभारही लागेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. दरम्यान, तातडीने महागाई भत्तासाठी आदेश दिल्यामुळे सीएम शिंदे कामाच्या बाबतीत किती तत्पर आहेत हे दिसून आले आहे. (ST employees will get dearness allowance, CM Shinde given Instructions to Transport Department )
परिवहन खात्याचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिष सिंह यांना फोनवरून कर्मचाऱ्यांचे डीए देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. एसटी कर्मचारी संघटनांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी महागाई भत्ता देण्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतर शुक्रवारी रात्री सह्याद्री अतिथीगृहावर एक बैठक पार पडली. या बैठकीत एसटी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता देण्याचे आदेश देण्यात आले.
काही दिवसांपूर्वीच एसटी कर्मचारी संघटनेच्या वतीने मुख्यमंत्री शिंदे यांना निवेदनाद्वारे काही मागण्या करण्यात आल्या होत्या. महागाई भत्ता देण्यात यावा, हजारो एसटी कर्मचाऱ्यांचं वेतन निश्चित केलं जावं, यासोबतच वेगवेगळ्या मागण्यांवर लक्ष वेधण्यात आले होते. सोमवारी रात्री उशिरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत एसटी कर्मचारी संघटनेची बैठक पार पडली. या बैठकीत या सूचना एकनाथ शिंदे यांनी दिल्या.
Read Also : नॉर्कोटिक्स टेररिझम मॉड्यूलचा मुख्य ऑपरेटरला एनआयएकडून अटक
तत्कालीन महाविकास आघाडी सरकारच्या वेळी एसटी कर्मचाऱ्यांनी वेगवेगळ्या मागण्यांसाठी संप पुकारला होता. त्यातील एसटीचं विलिनीकरण केलं जावं, ही प्रमुख मागणी एसटी कामगार संघटनांनी केली होती. कामगारांचा संप जवळपास तीन- चार महिने चालू होता. या संपावर तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने महागाई भत्त्याचा तोडगा काढला होता. एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ करण्यासोबत त्यांच्या बहुतांश मागण्या पूर्ण करण्यात आल्या होत्या. मात्र विलिनीकरणाची प्रमुख मागणी मान्य करण्यात आली नव्हती. मात्र संपावर तोडगा काढण्यासाठी त्यांच्या महागाई भत्त्यातही वाढ केली गेली होती.
Read Also : हरितालिकाचे व्रत करताना चुका केल्यास नाही मिळणार फळ
28 ऑक्टोबर 2021 रोजी अनिल परब यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ केली होती. सध्याच्या घडीला सरकारप्रमाणेच एसटी कर्मचाऱ्यांना 28 टक्के इतका महागाई भत्ता दिला जातो. 28 ऑगस्ट रोजी तत्कालीन परिवहन मंत्री अनिल परब यांनी महागाई भत्त्यामध्ये वाढ करत एसटी कर्मचाऱ्यांना 28 टक्के महागाई भत्ता दिला जाईल, अशी घोषणा केली होती. दरम्यान शिंदे-फडणवीस सरकार आल्यानंतर एसटी परिवहन खात्याचा विलिनीकरणाचा निकाल लगेच लावावा अशी मागणी विरोधकांकडून दबक्या आवाजात निघत होती. परंतु महागाई भत्त्यासाठी ज्याप्रमाणे तातडीने आदेश काढण्यात आला आहे, त्याच विद्युत वेगाने एसटी महामंडळाच्या इतर मागणीचा निर्णय लागेल अशी शक्यता आहे.
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.