मुंबई : तब्बल 5 महिन्यांच्या ब्रेकनंतर आजपासून लालपरी पुन्हा एकदा आपली गती पकडणार आहे. मुंबई (Mumbai) उच्च न्यायालयानं (High Court) एसटी (ST) कर्मचाऱ्यांना दिलेला अल्टिमेटम आज संपला असून आजपासून एसटीचे 77 हजारांहून अधिक कर्मचारी (Staff) कामावर हजर होणार आहेत. तर उर्वरित साडेचार हजार कर्मचारी चाचण्या पूर्ण करून उद्या कामावर रूजू होणार आहेत. तुर्तास अद्याप एकूण किती कर्मचारी आपल्या कर्तुव्य बजावलं याचा आकडा हाती आलेला नाही. दरम्यान, शुक्रवार 15 एप्रिल 2022 पर्यंत 34 हजार कर्मचारी परतले नव्हते. यामुळे एसटीच्या 16 हजार फेऱ्या कमी होत होत्या.
गेल्या पाच महिन्यांपासून 28 ऑक्टोबर 2021 पासून सुरू आहे. या संपात सहभागी असलेल्या कर्मचाऱ्यांना आधी 15 एप्रिल 2022 पर्यंत कामावर रुजू होण्याचे आदेश देण्यात आले होते. परंतु 15 एप्रिल रोजी बहुतेक कर्माचाऱ्यांनी आपल्या नोकरीकडे पाठ फिरवली होती. दरम्यान एसटी महामंडळाच्या विलिनीकरणाच्या मागणीसाठी जवळपास दीडशे दिवस संप पुकारणारे कर्मचारी आजपासून कामावर रूजू झालेत. जवळपासून पाच महिन्यांपासून संप पुकारल्यानं (ST Strike) राज्याची जीवनवाहिनी ठप्प झाली होती. दुर्गम भागात राहणारे नागरिक, विद्यार्थी यांना या संपाचा मोठा फटका बसला होता. त्यामुळे राज्यभरातील नागरिकांना, तसेच खासकरुन ग्रामीण भागातील नागरिकांना खूप मोठा दिलासा मिळणार आहे.
Read Also : मॅगी, कॉफी, किटकॅटच्या किंमतीत पुन्हा वाढण्याची शक्यता
मुंबई उच्च न्यायालयानं एसटी कामगारांना कामावर हजर होण्याचे आदेश दिले होते. ही मुदत आज शुक्रवार, 22 एप्रिल रोजी संपत आहे. गुरुवारी 21 एप्रिल रोजी 2,992 नवीन एसटी कर्मचारी कामावर दाखल झाले आहेत. आता हजेरीपटावरील 81,683 कर्मचाऱ्यांपैकी केवळ 4,721 कर्मचारीच उरले असून ते उद्यापर्यंतसेवेत दाखल होतील, अशी माहिती मिळत आहे.
Read Also : शिक्षक अन् कर्मचाऱ्यांना वाढवून मिळणार जाण्या-येण्याचा खर्च
संपामुळे तब्बल 150 दिवस राज्याच्या ग्रामीण भागातील जीवनवाहिनीची चाकं थांबवली होती. 22 एप्रिलपर्यंत कामावर हजर होण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयानं कामगारांना आदेश दिले आहेत. सध्या दररोज सरासरी सात हजार बसेसच्या आधारे 25 हजार फेऱ्या चालवीत त्याद्वारे 17 लाख प्रवाशांची वाहतूक होत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.