मुंबई : गेल्या ऑक्टोबर महिन्यापासूनपासून आझाद मैदानात (Azad Maidan) एसटी कर्मचाऱ्यांचे (ST staff) आंदोलन (agitation) सुरू आहे. आझाद मैदानामध्ये सुरू असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामध्ये मुंबई महानगर पालिकेकडून (Mumbai Municipal Corporation) मूलभूत सुविधा मिळत नाहीत. त्यामुळे एसटी कर्मचारी आक्रमक झाले आहेत. यामुळे मुंबई महापालिका आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस समोर एसटी कर्मचाऱ्यांनी (ST Workers) मुलभूत सोयी सुविधांसाठी आंदोलन सुरू केलं आहे.
एसटी कर्मचारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि मुंबई महापालिकेसमोर (BMC) आंदोलन करत आहेत. एसटी कर्मचाऱ्यांना पोलिसांनी (Police) आझाद मैदानात जाण्याची विनंती केली. मात्र, एसटी कर्मचाऱ्यांनी बोंबाबोंब आंदोलन सुरू केलं आहे. मुंबई महानगरपालिका मुख्यालयाबाहेरील रस्त्याच्या मध्यभागी येऊन एसटी कर्मचाऱ्यांनी चक्काजाम आंदोलन सुरू केलं आहे. कर्मचाऱ्यांनी केलेल्या आंदोलनामुळं पोलिसांनी अतिरिक्त पोलीस बळ मागवले आहे. पोलिसांच्या तीन ते चार गाड्या घटना स्थळावर पोहोचल्या आहेत. पोलिसांनी वाहतुकीचा खोळंबा होऊ नये म्हणून प्रयत्न सुरू केले आहेत. पोलिसांकडून एसटी कर्मचाऱ्यांना समजवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.
गेल्या पाच महिन्याहून अधिक काळ झाल एसटी कर्मचाऱ्यांचे आझाद मैदानावर आंदोलन सुरु आहे. मात्र, आंदोलनस्थळी मूलभूत सुविधा मिळत नसल्याचा आरोप एसटी कर्मचाऱ्यांनी केला आहे. यासंदर्भात मुंबई पालिकेकडे वेळोवेळी तक्रारी देखील दाखल करण्यात आल्या होता. मात्र, तरीदेखील सुविधा देण्यात आल्या नसल्याचे कर्मचाऱ्यांनी म्हटलं आहे.
मुंबईच्या सीएसएमटी स्टेशनबाहेर एसटी कर्मचाऱ्यांनी टॉयलेट आंदोलन सुरू केलं आहे. शेकडो एसटी कर्मचारी रस्त्यावर आंदोलनाला बसले आहेत. भर रस्त्यात एसटी कर्मचारी शौचास बसल्यानं पोलिसांसह प्रशासनाची झोप उडाली होती. आझाद मैदान परिसरात शौचाची सोय, आंघोळीची सोय नसल्याने एसटी कर्मचाऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला होता. एसटी कर्मचाऱ्यांनी सरकारला कुठे शौचास जायचं असा सवाल विचारला आहे.
दरम्यान, आज सकाळी साडेसहा वाजल्यापासूनचं कर्मचाऱ्यांनी मुंबई पालिकेसमोर आंदोलन सुरू केलं आहे. कर्मचाऱ्यांनी रस्ते जाम केले आहेत. या पाच महिन्यांच्या काळात आमचे दिडशे लोकांनी जीवन संपवले आहे. तरीदेखील सरकारने यावर निर्णय घेतला नसल्याच्या प्रतिक्रिया कर्मचाऱ्यांनी दिल्या. आंदोलनस्थळाकडे मुंबई पालिका पूर्ण दुर्लक्ष करत आहे. आंदोनस्थळी शौचालयाची सुविधा नाही, पिण्याच्या पाण्याची सुविधा नाही. सरकारने इथे काय केलं? असा सवाल कर्मचाऱ्यांनी उपस्थित केला आहे.
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.