मुंबईत शरद पवारांच्या बंगल्यावर एसटी कर्मचाऱ्यांनी फेकली चप्पल

मुंबई
रोहन जुवेकर
Updated Apr 08, 2022 | 18:13 IST

ST workers protest outside sharad pawar residence in Mumbai : एसटी कर्मचाऱ्यांनी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आणि महाविकास आघाडी सरकारचे 'गॉडफादर' शरद पवार यांच्या बंगल्यावर चप्पल फेकली. तसेच बंगल्याबाहेर सरकार विरोधी घोषणा देत आंदोलन केले.

ST workers protest outside sharad pawar residence in Mumbai
मुंबईत शरद पवारांच्या बंगल्यावर एसटी कर्मचाऱ्यांनी फेकली चप्पल 
थोडं पण कामाचं
  • मुंबईत शरद पवारांच्या बंगल्यावर एसटी कर्मचाऱ्यांनी फेकली चप्पल
  • शरद पवार यांच्या बंगल्याबाहेर सरकार विरोधी घोषणा देत आंदोलन
  • आंदोलकांना थोपविण्यासाठी शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक बंगल्याबाहेर पोलीस बंदोबस्त

ST workers protest outside sharad pawar residence in Mumbai : मुंबई : एसटी राज्य शासनात विलीन करून सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन श्रेणी लागू करावी तसेच थकीत वेतन द्यावे या मागण्यांसाठी मागच्या वर्षी (२०२१) दिवाळीपासून संपावर असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांचा संयम सुटत चालला आहे. संतापलेल्या एसटी कर्मचाऱ्यांनी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आणि महाविकास आघाडी सरकारचे 'गॉडफादर' शरद पवार यांच्या बंगल्यावर चप्पल फेकली. तसेच बंगल्याबाहेर सरकार विरोधी घोषणा देत आंदोलन सुरू केले. काही आंदोलकांनी बंगल्याच्या दिशेने दगड भिरकावल्याचेही वृत्त आहे. 

आंदोलकांना थोपविण्यासाठी शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक बंगल्याबाहेर पोलीस बंदोबस्त आहे. पोलीस असले तरी आंदोलकांचा आक्रमक पवित्रा कायम आहे. सुप्रिया सुळे यांनी चर्चेची तयारी दाखवली. पण आंदोलकांचा पवित्रा आक्रमक असल्यामुळे चर्चा करणे शक्य नाही, असे जाहीर केले. 

मुंबईत शरद पवारांच्या बंगल्याजवळ आंदोलक पोहोचल्यामुळे एसटी आंदोलनाचा प्रश्न आणखी गंभीर झाला आहे. याआधी महाराष्ट्राचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी एसटी कर्मचाऱ्यांना निर्वाणीचा इशारा दिला आहे. कर्मचार्‍यांनी त्वरित कामावर परतावे. जे कर्मचारी २२ एप्रिल २०२२ नंतर कामावर परत येतील अथवा मुदत संपल्यानंतरही परत येणार नाही अश सर्वांवर निलंबनाची कारवाई होईल; असे अनिल परब म्हणाले. एसटी महामंडळ तोट्यात असले तरी २२ एप्रिल २०२२ नंतर रिक्त जागांसाठी कंत्राटी पद्धतीने भरती करणार असल्याचेही अनिल परब यांनी जाहीर केले. परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिलेल्या निर्वाणीच्या इशाऱ्यानंतर संतापलेल्या एसटी कर्मचाऱ्यांनी थेट शरद पवारांच्या बंगल्याकडे कूच केले. 

कोरोना काळात जीव धोक्यात घालून काम केले. पण आम्हाला हक्काचा पगार वेळेत मिळाला नाही. सरकारच्या इतर विभागांच्या तुलनेत एसटीच्या कर्मचाऱ्यांना कमी पगार मिळतो. पण आमच्याकडून कामात कोणतीही तडजोड होत नाही. यामुळे एसटी राज्य शासनात विलीन करून सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन श्रेणी लागू करावी तसेच थकीत वेतन द्यावे; अशी मागणी एसटीच्या कर्मचाऱ्यांनी केली.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी