ST Workers Strike : एसटी कर्मचाऱ्यांचा आंदोलन पेटले, अनेक गाड्या रद्द, प्रवाशांचे हाल 

Maharashtra ST Employee Protest : एसटी महामंडळाचे (MSRTC) शासनामध्ये विलनीकरण करण्यात यावे या मागणीसाठी एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी राज्यात संप पुकारला आहे. यामुळे प्रवाशांचे खूप हाल झाले आहेत.  दिवाळीनंतर विशेषतः भाऊबीजेनंतर आपल्या घरी जाणाऱ्या भावा-बहिणींचे मोठ्या प्रमाणात खोळंबा झाला आहे. 

st workers strike maharashtra state road transport corporation employee protest
एसटी कर्मचाऱ्यांचा आंदोलन पेटले, अनेक गाड्या रद्द 
थोडं पण कामाचं
  • एसटी महामंडळाचे (MSRTC) शासनामध्ये विलनीकरण करण्यात यावे या मागणीसाठी एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी राज्यात संप पुकारला आहे.
  • यामुळे प्रवाशांचे खूप हाल झाले आहेत.  
  • दिवाळीनंतर विशेषतः भाऊबीजेनंतर आपल्या घरी जाणाऱ्या भावा-बहिणींचे मोठ्या प्रमाणात खोळंबा झाला आहे. 

Maharashtra ST Employee Protest : एसटी महामंडळाचे (MSRTC) शासनामध्ये विलनीकरण करण्यात यावे या मागणीसाठी एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी राज्यात संप पुकारला आहे. यामुळे प्रवाशांचे खूप हाल झाले आहेत.  दिवाळीनंतर विशेषतः भाऊबीजेनंतर आपल्या घरी जाणाऱ्या भावा-बहिणींचे मोठ्या प्रमाणात खोळंबा झाला आहे. 

एसटीच्या संपातील महत्त्वाचे मुद्दे : 


एस.टी. संपाबाबत राज्य सरकार दुपारपर्यंत अध्यादेश काढणार, तीन सदस्यीय समिती स्थापन करणार, राज्य सरकारची माहिती,

संध्याकाळी हायकोर्टात पुन्हा सुनावणी, ठोस निकाल येईपर्यंत कामगार संपावर ठाम


एसटी कर्मचाऱ्यांसोबत चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्र्यांना वेळ नाही का? भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांचा सवाल

आर्यन खानच्या सुटकेसाठी मुख्यमंत्री ठाकरे नवाब मलिक आणि गृहमंत्र्यांसोबत बैठका घेतात

मग एसटी कर्मचाऱ्यांसोबत चर्चा का होत नाही?- पडळकर

सांगलीत एसटी कर्मचाऱ्यांचा संप चिघळला, सकाळपासून लांबपल्ल्याच्या 10 गाड्या रद्द

Pune : पुण्यातील एसटी कर्मचाऱ्यांचा संपात सहभाग; स्वारगेट एसटी स्टँडवर गर्दी

रायगड जिल्ह्यातील एस टी कर्मचारी आजपासून पुन्हा बेमुदत संपावर 

प्रत्येक आगारातील कर्मचाऱ्यांनी दिले विभाग नियंत्रकांना पत्र..


रायगड जिल्ह्यातील आठ आगारातील कर्मचारी संपावर गेल्याने एसटी वाहतूक ठप्प..

 बुलढाण्यात एसटी वाहतूक ठप्प; जिल्ह्यातील अडीच हजार कर्मचारी संपावर 

नाशिकच्या डेपोमधून एकही बस मध्यरात्रीपासून बाहेर पडली नाही
शासनाच्या सेवेत विलीनीकरण करणे यांसह विविध मागण्यांसाठी st कर्मचाऱ्यांनी मध्यरात्री 12 वाजेपासून संपाला सुरवात केलीय. 

महागाई दिवसेंदिवस वाढतेय मात्र त्या तुलनेत पगार वाढ होत नसल्याची कैफियत कर्मचाऱ्यांनी मांडली

दापोलीत पुरुष कर्मचारी हातात बांगड्या भरून कामावर हजर
एकीकडे कर्मचारी आत्महत्या करत असतानाही तुम्ही कामावर जात आहेत, कामावर गेलात तर हातात बांगड्या भरून जा,असं पत्नीनं म्हटल्यानं बसचालक अशोक वनवे बांगड्या घालून कामावर हजर


गुहागरमध्ये एस टी कर्मचाऱ्याचा काम बंद ठेवून संपाला पाठिंबा.. 'एस.टी.महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण करावे'या मागणीसाठी पुकारलेल्या संपाला पाठिंबा देण्यासाठी काम बंद ठेवण्यात आले आहे.. 

अजून चिपळूण आगाराची वाहतूक सुरु आहे. 


मालेगाव,मनमाड,येवला यासह जिल्ह्यात पुन्हा एकदा संपाची हाक
आपल्या विविध मागण्यांसाठी एसटी कर्मचा-यांनी गेल्या दहा दिवसांपूर्वी उपोषण करुन बसेस बंद ठेवल्या होत्या.दोन दिवसांनंतर नाशिक जिल्ह्यातील अनेक डेपो सुरु झाले. काल पासून मालेगाव,मनमाड,येवला यासह जिल्ह्यातील अनेक एसटी कर्मचा-यांनी पुन्हा एकदा संपाची हाक दिली आहे.


कल्याणमध्ये एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला उत्स्फूर्त प्रतिसाद 

कल्याण डेपोतील एकही एस टी बाहेर निघाली नाही बसस्थानक पूर्णपणे बंद 
एस टी डेपोत पोलिस बंदोबस्त तैनात


राज्यभरातील 250 पैकी 220 डेपो बंद, प्रवाशांचे प्रचंड हाल

राज्यभरातील एसटी कर्मचारी संघटांनी पुन्हा एकदा संपाची हाक दिल्यानंतर आता राज्यभरातील ठिकठिकाणचे डेपो बंद होण्यास सुरुवात झाली आहे. सध्या 250 पैकी 220 डेपो बंद असल्याची माहिती एसटी महामंडळातील सूत्रांनी दिली आहे. सध्या केवळ मुक्कामी असणाऱ्या गाड्या पुन्हा एकदा आपल्या डेपोकडे पाठवण्यात येत आहेत. त्यामुळे गाड्या मिळत नसल्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल होताना पाहिला मिळत आहेत.  आज सकाळपासूनचं मुंबई सह उपनगरात एसटी बसस्थानकात प्रवाशांची गर्दी वाढताना पाहिला मिळत आहे.  

सांगलीत आज पहाटेपासून एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन  लांब पल्ल्याच्या बसफेऱ्या रद्द 

सांगलीत एसटी कर्मचाऱ्यांकडून पुन्हा संपाचे हत्यार उपसले आहे. यामुळे आज पहाटेपासून सांगली आगारात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. पहाटेपासून लांब पल्ल्याच्या एसटी बसेस या बंदोबस्तात रवाना केल्या जात आहेत.  या पार्श्वभूमीवर सांगली पोलिसांचा मोठा बंदोबस्त एसटी स्टॅण्ड परिसरात तैनात आहे.  दरम्यान,एसटीच्या विलीनीकरण करण्याच्या मागण्यांसाठी एसटी कामगारांनी सांगली आगाराचे कामकाज बंद पडले आहे. कोणत्याही परिस्थितीत माघार नाही आता आर या पार ची लढाई आहे असा इशारा देत एसटी कर्मचारी आंदोलनात सहभागी झाले आहेत. सकाळपासून 10 लांब पाल्याच्या बसफेऱ्या कर्मचाऱ्या अभावी रद्द करण्यात आल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

सोलापुरात एसटी थांबली

सोलापूरात देखील एसटीची चाकं थांबली, प्रवासासाठी अनेकजण बसच्या प्रतीक्षेत आहेत. मात्र मध्यरात्री पासून कर्मचाऱ्यांनी संपात सहभागी होण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे वाहतूक पूर्णपणे खोळंबली आहे


नेमकं काय आहे कारण... 

 एसटी महामंडळाचे (MSRTC) शासनामध्ये विलनीकरण करण्यात यावे या प्रमुख मागणीसाठी एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी राज्यात काही ठिकाणी ऐन दिवाळीत संप पुकारला आहे. सणासुदीच्या काळात या संपामुळं प्रवाशांचे मात्र हाल होत आहेत. दुसरीकडे एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत औद्योगिक न्यायालयाने दिलेल्या निर्देशाची मुंबई उच्च न्यायालयानेही गंभीर दखल घेतली आहे. गेल्या काही दिवसांपासून आपल्या विविध मागण्यांसाठी एसटी कर्मचारी आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत. सरकारने त्यांच्या काही मागण्या पूर्ण केल्या आहेत. मात्र आता महामंडळाचे शासनात विलनीकरण करावे यासाठी पुन्हा आंदोलनाला जोर मिळण्याची शक्यता आहे. काल उच्च न्यायालयात झालेल्या सुनावणी वेळी राज्य सरकारने मांडलेल्या प्रस्तावावर एसटी कामगार संघटनांनी नकार दर्शवल्याने संपाची कोंडी अद्यापही कायम आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी