ST Workers Strike : पगारवाढीसंदर्भात आज पुन्हा बैठक, संपाला ब्रेक लागण्याची शक्यता

मुंबई
भरत जाधव
Updated Nov 24, 2021 | 09:01 IST

ST Workers Strike :एसटी कर्मचाऱ्यांकडून (ST Workers ) वेतन वाढ (Salary increase) आणि महामंडळाचे (Corporation) राज्य शासनात (State Government) विलिनीकरण करण्यात यावे, या प्रमुख मागणीसाठी गेल्या महिन्याभरापासून संप सुरू आहे.

ST Workers Strike: Meeting again today regarding pay hike
ST Workers Strike : पगारवाढीसंदर्भात आज पुन्हा बैठक  |  फोटो सौजन्य: Indiatimes
थोडं पण कामाचं
  • एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे राज्यातील लाखो नागरिकांची गैरसोय होत आहे.
  • सरकारकडून कर्मचाऱ्यांच्या अंतरिम वेतनवाढीचा प्रस्ताव शिष्टमंडळापुढे ठेवण्यात आला आहे.
  • विलिनीकरणाच्या संदर्भात निर्णय घेण्यासाठी एक समिती स्थापन केली असून समितीच्या अहवालाने विलिनीकरणाचा निर्णय घेतला जाईल.

ST Workers Strike : मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांकडून (ST Workers ) वेतन वाढ (Salary increase) आणि महामंडळाचे (Corporation) राज्य शासनात (State Government) विलिनीकरण करण्यात यावे, या प्रमुख मागणीसाठी गेल्या महिन्याभरापासून संप सुरू आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे (Movement) राज्यातील लाखो नागरिकांची गैरसोय होत आहे. परंतु एसटी कर्मचाऱ्यांचा संप आता मिटण्याची शक्यता आहे. परिवहन मंत्री (Transport Minister) अनिल परब (Anil Parab) यांनी सह्याद्री अतिथीगृहावर बोलवलेल्या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली. तिढा सोडवण्यासाठी कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळानं पर्याय द्यावेत असही परबांनी म्हटले आहे. 

आज महत्त्वपूर्ण बैठक

सरकारकडून कर्मचाऱ्यांच्या अंतरिम वेतनवाढीचा प्रस्ताव शिष्टमंडळापुढे ठेवण्यात आला आहे. सरकारच्या प्रस्तावावर शिष्टमंडळ चर्चा करुन आज सकाळी 11 वाजता पुन्हा बैठक होणार आहे. या बैठकीत निर्णयाची शक्यता आहे. हा प्रस्ताव मान्य करावा आणि कर्मचाऱ्यांनी संप मागे घेऊन लगेच कामावर रुजू व्हावे, अशी विनंती मंत्री अनिल परब यांनी केली आहे. दरम्यान आजचा दिवस हा एसटी कर्मचाऱ्यांसाठी महत्वाचा असून, या बैठकीमध्ये संपावर तोडगा निघेल, अशी अपेक्षा आहे.

मंगळवारी आमदार गोपीचंद पडळकर, सदाभाऊ खोत आणि एसटीचे प्रतिनिधी यांच्यामध्ये तब्बल दोन तास बैठक झाली. बैठकीत सकारात्मक चर्चा झाल्याचे भाजप आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनीही सांगितले आहे. विलिनीकरणाच्या मुद्द्यावर ठाम आहोत. पण आपण एसटी कर्मचाऱ्यांशी चर्चा करुन निर्णय घेऊ, असेही पडळकर यांनी सांगितले आहे. तसेच, आम्ही पोटतिडकीने आमची बाजू मांडली. राज्यातील निलंबित झालेला कर्मचारी आहे, तो आझाद मैदान येथे येणार आहे. आज सरकारने विलनिकरण करणाची भूमिका स्पष्ट केली आहे. आज पुन्हा सकाळी 11 वाजता बैठक होणार आहे, असे सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी सांगितले आहे. 

संप चालू ठेवता येणार नाही

पगारवाढीचा प्रस्ताव ठेवल्यानंतर अनिल परब म्हणाले की, न्यायालयाने  विलीनीकरणाचा विचार करण्यासाठी समिती नेमली आहे. समितीचा जो काही अहवाल येईल तो आम्ही मान्य करू. पण तोपर्यंत संप चालू राहू शकत नाही. त्यामुळे कामगारांना अंतरिम वेतनवाढ देण्याचा पर्याय दिला आहे. एसटी कर्मचाऱ्यांसोबत सकारात्मक चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान आज अकरा वाजता होणाऱ्या बैठकीमध्ये एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर तोडगा निघण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे.

एसटीचे राज्य शासनाच्या सेवेमध्ये विलिनीकरण करावं या मागणीसाठी गेल्या 15 दिवसांपासून एसटी कर्मचारी आंदोलन करत आहेत. एसटी विलिनीकरणाचा प्रश्न हा न्यायालयात प्रलंबित असून त्यावर एक समिती स्थापन केली आहे. या समितीने 12 आठवड्यात आपला अहवाल द्यायचा आहे. समितीचा जो काही अहवाल असेल, तो राज्य सरकारला मान्य असेल, असं अनिल परब यांनी म्हटले आहे. परिवहन मंत्री अनिल परब आणि एसटी कर्मचारी शिष्टमंडळ यांच्यामध्ये सह्याद्री अतिथीगृह संपाबाबत बैठक पार पडली. या बैठकीस सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर हे उपस्थित होते. 

दोन पावलं मागे घ्या

कामगारांनी अधिक ताणू नये. सरकार दोन पावले पुढे यायला तयार आहे. तुम्ही दोन पावलं मागे या. चर्चेने मार्ग निघत असतो. एसटी सेवा ठप्प असल्याने प्रवाशांचे हाल सुरू आहेत. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी आपला संप मागे घ्यावा असे आवाहन देखील परब यांनी केले आहे.
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी