विदर्भात २७ जूनपासून आणि उर्वरित महाराष्ट्रात १५ जूनपासून शाळा सुरू करा, शासकीय आदेश

मुंबई
रोहन जुवेकर
Updated Jun 10, 2022 | 13:38 IST

Start schools in Vidarbha from 27th June and in rest of Maharashtra from 15th June, government order : कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक ती खबरदारी घेऊन विदर्भात २७ जूनपासून आणि उर्वरित महाराष्ट्रात १५ जूनपासून शाळा सुरू करण्याबाबत शासकीय पातळीवरून आदेश देण्यात आले आहेत.

Start schools in Vidarbha from 27th June and in rest of Maharashtra from 15th June, government order
विदर्भात २७ जूनपासून आणि उर्वरित महाराष्ट्रात १५ जूनपासून शाळा सुरू करा, शासकीय आदेश  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • विदर्भात २७ जूनपासून शाळा सुरू करा
  • उर्वरित महाराष्ट्रात १५ जूनपासून
  • शासकीय आदेश

Start schools in Vidarbha from 27th June and in rest of Maharashtra from 15th June, government order : मुंबई : कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक ती खबरदारी घेऊन विदर्भात २७ जूनपासून आणि उर्वरित महाराष्ट्रात १५ जूनपासून शाळा सुरू करण्याबाबत शासकीय पातळीवरून आदेश देण्यात आले आहेत. शैक्षणिक वर्ष २०२२-२३ मध्ये राज्यातील शाळांच्या कालावधीमध्ये एकवाक्यता आणि सुसंगती आणण्यासाठी शासकीय पातळीवर हालचाली सुरू आहेत. या शासकीय कार्यवाहीचा भाग म्हणून विदर्भात २४ आणि २५ जून रोजी तर उर्वरित महाराष्ट्रात १३ आणि १४ जून रोजी संबंधित शाळेचे शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी शाळेची स्वच्छता करतील. शाळेची शोभा वाढविण्यासाठी आवश्यक ते उपाय करतील. शाळेत कोविड प्रोटोकॉलचे पालन करण्यासाठी आवश्यक ती तयारी करतील. 

आधीच्या शासन निर्णयानुसार विदर्भात २३ जून आणि उर्वरित महाराष्ट्रात १३ जूनपासून शैक्षणिक वर्षाला सुरुवात होणार आहे. पण कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक ती तयारी करुन घेण्यासाठी शाळा प्रशासनांना वेळ दिला जाईल. विद्यार्थी विदर्भात २७ जूनपासून आणि उर्वरित महाराष्ट्रात १५ जूनपासून शाळेत येतील. यासाठी आवश्यक ती कारवाई करण्यास शालेय शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी शिक्षण संचालक, उपसंचालक, शिक्षणाधिकारी यांना सांगितले. संबंधित अधिकारी स्थानिक पातळीवर विद्यार्थ्यांनी शाळेत कधी यायचे याचा निर्णय औपचारिकरित्या जाहीर करतील.

कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर शासन, आरोग्य विभाग, स्थानिक आपत्ती कक्षाकडून वेळोवेळी देण्यात आलेले तसेच यापुढे देण्यात येणारे निर्देश आणि सूचना यांचे काटेकोरपणे पालन होईल, याची दक्षता घेण्याचे तसेच शाळेमध्ये येणाऱ्या मुलांची आणि पालकांची कोरोना संदर्भात जनजागृती करण्याचे निर्देश मांढरे यांनी दिले आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी