Uddhav Thackeray BMC Election : माझ्यावर झालेल्या टीकेला उत्तर देईन,निवडणूकीच्या कामाला लागा, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे शिवसैनिकांना आदेश

Uddhav Thackeray Shisvsena Meeting पुढील काही महिन्यांत मुंबई, ठाणे आणि इतर महानगरपालिका निवडणूक होऊ घातल्या आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना निवडणुकीच्या कामाला लागण्याचे आदेश दिले आहेत. शिवसेनेने केली कामे जनतेपर्यंत पोहोचवण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.

Multibagger Stock
थोडं पण कामाचं
  • शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना निवडणुकीच्या कामाला लागण्याचे आदेश दिले आहेत.
  • शिवसेनेने केली कामे जनतेपर्यंत पोहोचवण्याचे निर्देशही
  • उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला.

Uddhav Thackeray Shisvsena Meeting : मुंबई : पुढील काही महिन्यांत मुंबई, ठाणे आणि इतर महानगरपालिका निवडणूक (BMC Election)  होऊ घातल्या आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Shivsena Chief Uddhav Thackeray) यांनी शिवसैनिकांना निवडणुकीच्या कामाला लागण्याचे आदेश दिले आहेत. शिवसेनेने केली कामे जनतेपर्यंत पोहोचवण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले. मंगळवारी रात्री उशिरा उद्धव ठाकरे, शिवसेनेचे नेते आणि विभागप्रमुखांमध्ये ऑनलाईन बैठक पार पाडली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला.

गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आजारी होते, त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाल्यानंतर ते आराम करत होते. हिवाळी अधिवेशनालाही ते अनुपस्थित होते. अखेर दोन महिन्यांच्या कालावधीनंतर त्यांनी एका ऑनलाईन कार्यक्रमात हजेरी लावून पुन्हा कामास सुरूवात केली होती. 

टीकाकारांना उत्तर

या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर होणार्‍या टीकेचा विषय निघाला. त्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी माझ्यावर झालेल्या टीकेचे उत्तर आपण कामाने देऊ असे असे म्हणाले. विरोधकांना काय उत्तर द्यायचे आहे ते मी देईन तुम्ही कामाला लागा, शिवसेनेची कामे जनतेपर्यंत पोहोचवा, निवडणुकीच्या कामाला लागा असे आदेश उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. 

शरद पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीची बैठक

मुंबईत आणि राष्ट्रवादी काँग्रेसचीही बैठक पार पडणार आहे. मुंबईच्या व्हाय बी सेंटरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली ही बैठक पार पडणार असून या बैठकीत राष्ट्रवादी मंत्री उपस्थित राहणार आहे. या बैठकीत मंत्र्यांची कामगिरी, कोरोना आणि इतर विषयांवर चर्चा होणार आहे. केंद्र सरकारने आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्यांना आरक्षण जाहीर केले होते, परंतु त्यात पाच एकर शेतीची अट नमूद करण्यात आली आहे. या विषयावर चर्चा करून केंद्र सरकारकडे याबाबत पाठपुरावा करण्यावर या बैठकीत चर्चा होणार आहे. शरद पवार दर दोन तीन महिन्यांनी आपल्या मंत्र्यांच्या आढावा घेत असतात, पवार या मंत्र्यांच्या कामगिरीचा आढवा या बैठकीत घेणार आहेत. राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. त्यासाठी शिवसेना आणि काँग्रेस पक्षाने तयारी केली असून राष्ट्रवादीची काय भूमिका असेल यावर ही बैठकीत चर्चा होणार आहे. बैठकीनंतर पक्षाचे प्रवक्ते नवाब मलिक माध्यमांसमोर याबाबत माहिती देतील. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी