कृषी विद्यापीठातील धक्कादायक प्रकार, कृषीमंत्र्यांनी दिले कारवाईचे आदेश

कृषि विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवर कोविड १९ असा धक्कादायक  उल्लेख केलेल्या प्रकरणाची राज्याचे कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी गंभीर दखल घेतली आहे.

State Agriculture Minster Dada Bhuse gave strict instruction to Agriculture Universities
कृषी विद्यापीठातील धक्कादायक प्रकार, कृषीमंत्र्यांनी दिले कारवाईचे आदेश   |  फोटो सौजन्य: फेसबुक

थोडं पण कामाचं

  • विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवर कोविड १९ उल्लेख करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे कृषिमंत्र्यांचे निर्देश
  • राज्य  शासनाचे कुठलेही आदेश नसताना तसा उल्लेख  करण्याचा आदेश देणाऱ्यांची चौकशी करून कारवाई करण्याचे निर्देश कृषिमंत्री भुसे यांनी महाराष्ट्र कृषि शिक्षण आणि संशोधन परिषदेला दिले आहेत.
  • यासंदर्भात महाराष्ट्र कृषि शिक्षण आणि संशोधन परिषदेच्या महासंचालकांना तसेच सर्व कृषि विद्यापीठाच्या कुलगुरूंना कृषी मंत्र्यांनी पत्र पाठवले आहेत.

मुंबई : कृषि विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवर कोविड १९ असा धक्कादायक  उल्लेख केलेल्या प्रकरणाची राज्याचे कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी गंभीर दखल घेतली आहे. यासंदर्भात राज्य  शासनाचे कुठलेही आदेश नसताना तसा उल्लेख  करण्याचा आदेश देणाऱ्यांची चौकशी करून कारवाई करण्याचे निर्देश कृषिमंत्री भुसे यांनी महाराष्ट्र कृषि शिक्षण आणि संशोधन परिषदेला दिले आहेत. अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. 


यासंदर्भात महाराष्ट्र कृषि शिक्षण आणि संशोधन परिषदेच्या महासंचालकांना तसेच सर्व कृषि विद्यापीठाच्या कुलगुरूंना पाठविलेल्या पत्रात कृषिमंत्र्यांनी म्हटले आहे की, कृषि विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवर कोविड १९ चा उल्लेख शासन आदेश नसतानाही करण्यात आला आहे. हा उल्लेख करण्याचा आदेश देणाऱ्या संबंधितांची चौकशी करून कठोर ती   कारवाई करण्यात यावी, तसेच त्याबाबतचा अहवाल शासनाला सादर करण्याचे निर्देश या पत्रात दिले आहेत.


कृषी विद्यापीठांचा अजब प्रकार समोर आल्यानंतर राज्य सरकारकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे. गुणपत्रिकेवर 'प्रमोटेड कोविड-१९' असा शिक्का मारायला सांगितलेले नाही.  कृषी विद्यापीठांतील गुणपत्रिकेवर ' प्रमोटेड कोविड-१९' असा शिक्का मारणे हा अजब प्रकार आहे. विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होईल, अशी माहिती कायदेतज्ज्ञ असीम सरोदे यांनी दिली. याबाबत जर राज्य शासनाने योग्य पाऊल उचलेले नाही तर आपण याबाबत आवाज उठवणार आहोत, अशी माहिती असीम सरोदे यांनी दिली. मार्कशिटवर 'प्रमोटेड कोविड-१९'  शिक्का मारणे हा विषमता अंकित करण्याचा प्रकार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांवर अन्याय होईल, असे ते म्हणालेत. कृषी विद्यापीठातील गुणपत्रिकेवर ' प्रमोटेड कोविड-१९' असा शिक्का मारणे अत्यंत चुकीचे आहे. आम्ही आज याविषयावर उच न्यायालयात याचिका दाखल करणार आहोत. ज्यांना इच्छा असेल त्यांनी त्वरित माझ्याशी संपर्क करावा, असे त्यांनी आवाहन केले आहे.

राज्य शासनाच्या निर्णयानुसार बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी, मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी आणि डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला या चार कृषी विद्यापीठांनी बी एसस्सी अग्रीच्या शेवटच्या वर्षाच्या परीक्षा घेतल्या आहेत. उरलेल्या परीक्षा न घेता उद्यान विद्या, कृषी जैवतंत्रज्ञान, कृषी, वानविद्या, कृषी व्यवसाय व्यवस्थापन, कृषी अभियांत्रिकी अन्न तंत्रज्ञान या शाखांच्या विद्यार्थ्यांना ' प्रमोटेड कोविड-१९' शिक्का असलेल्या मार्कशीट देऊन प्रमोट करण्याचा निर्णय विद्यार्थ्यांच्या भावी आयुष्यावर डाग लावणारा, त्यांना विषमतापूर्ण वागणुकीचा सामना करायला लावणारा व मानहानीपूर्ण प्रकार आहे. मानवी हक्क उल्लंघनच्या शक्यता असलेला हा प्रकार न्यायालयात मांडण्यापूर्वी आज मी संबंधित कृषीमंत्री आणि राज्य शासनातील लोकांशी प्रत्यक्ष बोलणार आहे, असीम सरोदे यांनी सांगितले. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी