राज्याने आठवड्याला मागितले ४० लाख डोस; केंद्राने पाठवली फक्त साडेसात लाख लस

मुंबई
भरत जाधव
Updated Apr 08, 2021 | 15:54 IST

कोरोना लसीकरणावरुन राज्य सरकार आणि केंद्र असा वाद उभा राहत आहे.

State asks for 4 million doses a week
महाराष्ट्राला गरजेपेक्षा कमी लसींचा पुरवठा   |  फोटो सौजन्य: Indiatimes

थोडं पण कामाचं

  • सर्वाधिक रुग्ण असलेल्या महाराष्ट्राला सर्वात कमी लसींचा पुरवठा
  • महाराष्ट्राशी केंद्र सरकारचा दुजाभाव
  • सातारा, सांगली, पनवेलमध्ये लसीकरण बंद

मुंबई : कोरोना (Corona Vaccination) लसीकरणावरुन राज्य सरकार(State Government) आणि केंद्र (Central Government) असा वाद उभा राहत आहे. इतर राज्यांपेक्षा जास्त रुग्ण संख्या महाराष्ट्रात असताना लसींचा कमी पुरवठा केला जात आहे. कोरोना लसीकरणात महाराष्ट्र देशात अग्रेसर राज्य आहे. रुग्णसंख्या वाढत असल्याने राज्यात लसीकरणाला वेग देण्यासाठी दर आठवड्याला ४० लाख डोसेस देण्याची मागणी राज्याने केंद्र शासनाला केली आहे. मात्र त्याला प्रतिसाद देताना केंद्राकडून आज साडेसात लाख डोस पाठविण्यात आल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Health Minister Rajesh Tope) म्हणाले. 
लसीकरणाबाबत सविस्तर माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत आरोग्यमंत्री बोलत होते.(State asks for 4 million doses a week The Central government sent only seven and a half lakhs )

अन्य राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्राची लोकसंख्या जास्त असताना आणि देशातील एकूण रुग्णांपैकी ५५ टक्के सक्रीय रुग्ण महाराष्ट्राला गरजेनुसार लसींचा पुरवठा झाला पाहिजे, एवढीच अपेक्षा आहे. कोरोनाच्या संकट काळात केंद्र आणि राज्य शासनाने  हातात हात घालून जनतेला वाचवले पाहिजे ही काळाची गरज असल्याचे मत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज येथे व्यक्त केले. 


आरोग्यमंत्री श्री. टोपे यांच्या पत्रकार परिषदेतील मुद्दे: 

  1. लसींच्या पुरवठ्यावरून केंद्र शासनासोबत वाद-विवादाचा विषय नाही. मात्र ६ कोटी लोकसंख्या असलेल्या आणि सध्या १७ हजार सक्रीय असलेल्या गुजरात राज्याला लसीचे १ कोटी डोस देण्यात आले. गुजरातच्या दुप्पट लोकसंख्या आणि सुमारे साडे चार लाख सक्रीय रुग्ण असलेल्या महाराष्ट्रालाही १ कोटी ४ लाख डोस देण्यात आले. त्यातील सुमारे ९ लाख डोस शिल्लक आहेत. त्यामुळे सातारा, सांगली, पनवेल या ठिकाणी लसीकरण बंद ठेवण्यात आले आहे.
  2. महाराष्ट्राची मागणी दर आठवड्याला ४० लाख डोस देण्याची असताना प्रत्यक्षात ७.५ लाख डोस देण्यात येणार आहेत. याबाबत आज पुन्हा केंद्रीय आरोग्यमंत्र्यांशी चर्चा केल्यानंतर त्यात १५ एप्रिलनंतर वाढ करून १७.५ लाख डोस पुरविण्यात येणार आहेत.
  3. सध्या महाराष्ट्राला साडे सात लाख डोस देतानाच उत्तर प्रदेशला ४८ लाख, मध्ये प्रदेशला ४० लाख, गुजरातला ३० लाख आणि हरियाणाला २४ लाख डोस पुरविण्यात आले. मग लसीकरणात अग्रेसर असलेल्या आणि सर्वाधिक सक्रिय रुग्ण असलेल्या महाराष्ट्राला फक्त ७.५ लाख डोस का? असा प्रश्न टोपे यांनी केला. 
  4. रुग्ण संख्या, चाचण्या, सक्रीय रुग्ण याबाबत महाराष्ट्राची अन्य राज्यांशी तुलना केंद्र शासनाने दर दश लक्ष हे प्रमाण लावावे आणि त्याप्रमाणे तुलना करावी. तसे होताना दिसत नाही. 
  5. अनेक विकसीत देशांनी १८ वर्षांवरील नागरिकांना लसीकरण सुरू केले आहे. महाराष्ट्रात दिवसेंदिवस वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन १८ ते ४० वयोगटातील नागरिकांना लसीकरणाची मागणी केली. 
  6. राज्य केंद्राच्या नियमाप्रमाणे ७०:३० या प्रमाणात आरटीपीसीआर चाचण्या करीत आहे. मुंबई, पुणे सारख्या शहरांमध्ये दर दशलक्ष साडेती ते चार लाख चाचण्या केल्या जात आहेत जे देशात सर्वाधिक आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी