राज्य सरकार लवकरच आर्थिक पॅकेज जाहीर करणार -  अजित पवार 

राज्याला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी लवकरच राज्य सरकार आर्थिक पॅकेज जाहीर करणार असल्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी दिली.

state govt will announced economic package soon ajit pawar
राज्य सरकार लवकरच आर्थिक पॅकेज जाहीर करणार -  अजित पवार   |  फोटो सौजन्य: Times Now

थोडं पण कामाचं

  • राज्याला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी लवकरच राज्य सरकार आर्थिक पॅकेज जाहीर करणार असल्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी दिली.
  • राज्यातील जनतेला दिलासा देण्यासाठी राज्य सरकार कधी पॅकेज देणार अशी विचार राज्यातील विरोधी पक्ष करीत आहे
  • गेल्या अडीच महिन्यांपासून राज्यातील व्यवहार ठप्प आहे. त्यामुळे राज्याला मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले आहे.

पिंपरी  : राज्याला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी लवकरच राज्य सरकार आर्थिक पॅकेज जाहीर करणार असल्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी दिली. राज्यातील जनतेला दिलासा देण्यासाठी राज्य सरकार कधी पॅकेज देणार अशी विचार राज्यातील विरोधी पक्ष करत आहे. या बाबत पत्रकारांनी अजित पवार यांना छेडले असता त्यांनी ही माहिती दिली. 

केंद्र सरकारने देशातील जनतेला २० लाख कोटी रुपयांचे आर्थिक पॅकेज दिले आहे. पण या २० लाख कोटींच्या आर्थिक पॅकेजचा फायदा राज्यातील जनतेला किती होणार हा प्रश्नच आहे. नुकते पॅकेज जाहीर करून नाही तर प्रत्यक्ष मदत करणारे पॅकेज राज्य सरकार जाहीर करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. 

मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय 

गेल्या अडीच महिन्यांपासून राज्यातील व्यवहार ठप्प आहे. त्यामुळे राज्याला मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले आहे. त्यामुळे या संकटाच्या परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी लवकरच आर्थिक पॅकेजचा निर्णय घेणार आहे.  शेती, उद्योगांसह विविध क्षेत्रांसाठी या पॅकेजच्या माध्यमातून आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. केंद्राच्या धर्तीवर महाराष्ट्र सरकारनंही पॅकेज जाहीर करावं अशी मागणी विरोधकांनी केली होती. त्यावरही अजित पवार यांनी भाष्य केलं. 'केंद्राच्या पॅकेजमधून प्रत्यक्षात राज्यांच्या हाती काय पडणार आहे याबाबत अनेक मतप्रवाह आहेत. काहींच्या मते हे केवळ मोठमोठे आकडे आहेत. हातावर पोट असलेल्या माणसाला मदत करण्याची खरी गरज आहे,' असं अजित पवार म्हणाले.

आषाढी वारी संदर्भात निर्णय 

येत्या आषाढीला पंढरपुरात येणाऱ्या पायी वारी संदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्त्वाखाली विविध पालखी सोहळ्यांच्या प्रमुखांशी बैठक झाली. त्यात आगामी काळात पायी वारी न काढता वाहनाच्या माध्यमातून आषाढीला संताच्या पालख्या पंढरीत दाखल कराव्या असा सर्वानुमते निर्णय घेण्यात आला आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी