Uday Samant : राज्यातील विद्यापीठ, कॉलेज पुन्हा होणार का ऑनलाईन? उदय सामंत यांच्या निर्णयकडे लक्ष 

University and collages online । उदय सामंत यांनी कोविड-19 आणि ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर विद्यापीठ/महाविद्यालय आणि लसीकरणाबाबत ऑनलाईन राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, अकृषी विद्यापीठाचे कुलगुरू यांच्या सोबत आढावा बैठक झाली. 

State universities, colleges will be online again? all Eyes on  Uday Samant  decision
राज्यातील विद्यापीठ, कॉलेज पुन्हा होणार का ऑनलाईन?   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • महाराष्ट्रासमोरील कोरोना विषाणू (Corona) संसर्गाच्या तिसऱ्या लाटेचं संकट समोर ठाकले
  • राज्यातील अकृषी विद्यापीठांच्या कुलगुरु आणि शिक्षण विभागाच्या अधिकारी, विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांची तातडीची बैठक घेतली.
  • महाविद्यालय कशी सुरु राहणार याबाबत आज निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.

Uday Samant । मुंबई: महाराष्ट्रासमोरील कोरोना विषाणू (Corona) संसर्गाच्या तिसऱ्या लाटेचं संकट समोर ठाकले असताना  राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी काल राज्यातील अकृषी विद्यापीठांच्या कुलगुरु आणि शिक्षण विभागाच्या अधिकारी, विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांची तातडीची बैठक घेतली. या बैठकीत राज्यातील विद्यापीठे आणि त्याअंतर्गत येणाऱ्या महाविद्यालयांमध्ये ऑनलाईन शिक्षण सुरु करावं असा सूर पाहायला मिळाला. महाविद्यालय कशी सुरु राहणार याबाबत आज निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.

गेल्या दोन दिवसांत राज्यात मुंबई, ठाणे आणि पुणे या शहरातील पहिली ते नववी आणि अकरावीचे ऑफलाइन वर्ग बंद करण्यात आले. तसा काहीसा निर्णय विद्यापीठ आणि महाविद्यालयांबाबत होण्याची शक्यता आहे. 

ऑफलाइन कॉलेज सुरु की बंद 

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी काल प्रत्येक जिल्ह्याचा आढावा जिल्हाधिकाऱ्यांकडून घेतला. उदय सामंत आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करुन महाविद्यालयातील शिक्षण ऑफलाईन की ऑनलाईन यासंदर्भातील निर्णय जाहीर करण्याची शक्यता आहे. मुंबई पुण्यासारख्या शहरांमध्ये ऑनलाईन शिक्षण सुरु करण्यात येणार असल्याची माहिती आहे. उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या अखत्यारित येणाऱ्या वसतिगृहांवर देखील निर्बंध लादले जाण्याची शक्यता आहे.


बैठकीला कोण कोण उपस्थित?

उच्च व इतर तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांची कोविड-19 आणि ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर विद्यापीठ/महाविद्यालय आणि लसीकरणाबाबत राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, अकृषी विद्यापीठाचे कुलगुरू यांच्या सोबत ऑनलाइन  आढावा बैठक झाली आहे. बैठकीला उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधानसचिव विकासचंद्र रस्तोगी, उच्च व तंत्र शिक्षण संचालक धनराज माने, तंत्र शिक्षण संचालक अभय वाघ, सर्व जिल्हाधिकारी, अकृषी विद्यापीठाचे कुलगुरू उपस्थित होते.

राज्यातील 33 जिल्हाधिकारी, 6 विभागीय आयुक्त, आणि 13 कुलगुरू उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत ऑनलाईन बैठकीला उपस्थित होते.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी