Owaisi on Secularism : मुस्लिम समाजाने राजकीय धर्ननिरपेक्षेपासून दूर रहावे, खासदार ओवेसी यांचे आवाहन

निर्णय घेण्यात आमचा सहभाग नाही, कुठलाही अधिकार नाही. धर्मनिरपेक्ष या शब्दामुळे मुस्लिम समाजाचे मोठे नुकसान झाले असेही ओवेसी म्हणाले. stay away from political secularism mp asaduddin owaisi appeal to Muslim community  

asaduddin owaisi
असादुद्दीन ओवेसी  
थोडं पण कामाचं
  • मुस्लिम समाजाने राजकीय धर्ननिरपेक्षेपासून दूर रहावे
  • संविधानात नमूद असलेल्या धर्मनिरपक्षेतवर माझा विश्वास
  • मुस्लिम समाजाच्या तुलनेत मराठा समाजाचा जीवन स्तर चांगला

Owaisi on Secularism : मुंबई : मुस्लिम समाजाने (muslim community) राजकीय धर्मनिरपेक्षपासून (political securalism)  दूर रहावे असे आवाहन एमआयएमचे (AIMIM) अध्यक्ष आणि खासदार असादुद्दीन ओवेसी (asaduddin owaisi) यांनी केले आहे. तसेच मुस्लिमांवर अन्याय झाले असून या समाजाला सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या पुढे जाण्यासाठी कुठलीच मदत नाही मिळाली असा आरोपही त्यांनी यावेळी केली.

stay away from political secularism mp asaduddin owaisi appeal to Muslim community  

मुंबईतल्या एका जनसभेला संबोधित करताना ओवेसी म्हणाले की, संविधानात नमूद असलेल्या धर्मनिरपक्षेतवर माझा विश्वास आहे. परंतु या धर्मनिरपेक्षतेमुळे मुस्लिम समाजाला काय मिळाले? आम्हाला ना शिक्षणात आरक्षण मिळाले ना नोकरीत. निर्णय घेण्यात आमचा सहभाग नाही, कुठलाही अधिकार नाही. धर्मनिरपेक्ष या शब्दामुळे मुस्लिम समाजाचे मोठे नुकसान झाले असेही ओवेसी म्हणाले.

ओवेसी यांनी महाविकास आघाडीवर टीका केली. महाराष्ट्रात केवळ २२ टक्के मुलं प्राथमिक विद्यालयात प्रवेश घेतात. तर मुस्लिम समजात केवळ ४.९ टक्के पदवीधर आहेत. राज्यात ८३ टक्के मुस्लिम भूमीहीन का आहेत असा सवाल त्यांनी उपस्थित केला. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेला फक्त मराठा समाजाबद्दल आत्मीयता आहे का असेही ओवेसी म्हणाले.

मुस्लिम समाजाच्या तुलनेत मराठा समाजाचा जीवन स्तर चांगला आहे असा दावा खासदार ओवेसी यांनी केला आहे. तसेच ओमायक्रॉनचे संकट पाहता मुंबईत कलम १४४ लागू करण्यात आले आहे. त्यावर टीका करताना ओवेसी म्हणाले की, राहुल गांधी लवकरच मुंबई दौर्‍यावर येणार आहेत, तेव्हा हा कर्फ्यू असणार आहे का? तेव्हा ओमायक्रॉन नव्हे तर सत्तेची ताकद असणार आहे असेही ओवेसी म्हणाले आहे.

काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेने मिळून एकत्र राज्यात सत्तास्थापन केले. परंतु मुस्लिमांसाठी शिक्षण आणि नोकरीसाठी ५ टक्के आरक्षण देण्याचे आश्वास विसरले असेही ओवेसी म्हणाले.

काँग्रेस आणि राष्ट्रवादीने नेहमीच एमआयएमला धर्मनिरपेक्ष मत खाण्याचा आरोप केला. परंतु आता शिवसेना धर्मनिरपेक्ष झाली आहे का असा सवाल ओवेसी यांनी विचारला. तसेच शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानसभेत शिवसैनिकांनी बाबरी मशीद पाडली हे गर्वाने सांगितले तेव्हा काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते गप्प का होते असेही ओवेसी यावेळी म्हणाले.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी