सातारा-बारामती-मावळमध्ये जोर लावा, भाजपच्या 'मिशन ४५' साठी ठरली स्टॅस्ट्रेजी

maharashtra bjp: लोकसभेच्या निवडणुकांना अद्याप दोन वर्षे बाकी असतानाच भाजपचे महाराष्ट्रात ‘मिशन ४५’ सुरू झाले आहे. यादृष्टीने लोकसभेच्या तयारीला लागण्याचे आवाहन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भाजप पदाधिकाऱ्यांना केले आहे.

Strengthen Satara-Baramati-Maval, strategy for BJP's 'Mission 45'
Strengthen Satara-Baramati-Maval, strategy for BJP's 'Mission 45'  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • २०२४च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई भाजप प्रदेश कार्यालयात भाजप नेत्यांची बैठक
  • राष्ट्रवादीच्या बालेकिल्यात जोर लावण्याचे प्लॅनिक केले
  • शिवसेनेच्या ताब्यात असणाऱ्या १८ मतदारसंघांवर भाजपचे विशेष लक्ष असणार आहे.

मुंबई : लोकसभा निवडणूक २०२४ साठीच्या तयारी आणि रणनिती ठरविण्यासाठी आज महाराष्ट्र राज्य भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, राष्ट्रीय महामंत्री विनोद तावडे, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, श्रीकांत भारती, आशिष शेलार, राम शिंदे व पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीत राज्यातील लोकसभेच्या ४८ जागांपैकी भाजपच्या ४५ जागा निवडून आणण्याच्या दृष्टीने मिशन ४५ ची घोषणा करण्यात आली. एकंदरित आतापासून तयारी सुरु केल्याने २०२४ च्या निवडणुकीचे भाजपने रणशिंग फुंकले आहे. (Strengthen Satara-Baramati-Maval, strategy for BJP's 'Mission 45')

अधिक वाचा : 

SSC Result 2022, MSBSHSE SSC Exam Result 2022, महाराष्ट्रात दहावीचा ऑनलाईन निकाल शुक्रवार १७ जून रोजी दुपारी १ वाजता

यावेळी फडणवीस म्हणाले, "ज्या जागा आम्ही जिंकलो आहोत, त्याच्यावर तर आमचं लक्ष आहेच. पण आम्हाला ज्या जागा जिंकायच्या आहेत, त्यावर आम्ही अधिक लक्ष केंद्रीय करतोय. १६ मतदारसंघ आम्ही निवडलो आहेत, याव्यतिरिक्त ८ मतदारसंघावर आम्ही अधिक लक्ष ठेवणार आहोत, असं सांगत भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने लोकसभेच्या काही जागा निवडल्या आहेत. ज्या जागांवर आम्ही अधिक लक्ष केंद्रीत करणार आहोत".

अधिक वाचा : 

केतकी चितळेला जामीन, तरी मुक्काम पोस्ट ठाणे जेल!

मिशन ४५ साठी एक समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीचे माजी मंत्री आमदार चंद्रशेखर बावनकुळे कोऑर्डिनेट करत आहेत. भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने १६ मतदारसंघ निवडले आहेत. पैकी १० मतदारसंघ शिवसेनेचं प्राबल्य असलेले आहेत. त्या प्रत्येक लोकसभा मतदारसंघासाठी एक प्रभारी नेमला आहे. त्यामध्ये बुलढाणा- खा. अनिल बोंडे, हिंगोली- आमदार राणा जगजीतसिंग, पालघर- नरेंद्र पवार, कल्याण- संजय केळकर, दक्षिण मध्य मुंबई - प्रसाद लाड, दक्षिण मुंबई - संजय उपाध्याय, शिर्डी- राहुल आहेर, रत्नागिरी-सिंधुदुर्ग - आशिष शेलार, कोल्हापूर- सुरेश हळवणकर, हातकणंगले- गोपीचंद पडळकर यांची नेमणूक करण्यात आली आहे. 

अधिक वाचा : 

राज्य सरकारमधील अर्धा डझन मंत्री पोलिसांच्या ताब्यात, ईडीची कारवाईच्या विरोधात काॅंग्रेस आक्रमक

या प्रभारींनी संबंधित लोकसभा मतदारसंघातल्या सर्व तालुक्यांमध्ये फिरुन केंद्र सरकारच्या विविध योजना जनतेपर्यंत घेऊन जाण्यास सांगितलं आहे. शिवाय वेळोवेळी मतदारसंघातील दौरे, जनतेच्या भेटीगाठी, सभा-संमेलनं असा तगडा कार्यक्रम आखण्याचं भाजपने सुचवलं आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी