कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी महाराष्ट्रात कडेकोट बंदोबस्त

मुंबई
रोहन जुवेकर
Updated Apr 13, 2022 | 21:48 IST

Strict security measures in Maharashtra to maintain law and order : उद्यापासून महाराष्ट्रात विविध धर्मियांचे धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. या कार्यक्रमांच्या वेळी कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्याचा निर्णय झाला आहे.

Strict security measures in Maharashtra to maintain law and order
कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी महाराष्ट्रात कडेकोट बंदोबस्त 
थोडं पण कामाचं
  • कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी महाराष्ट्रात कडेकोट बंदोबस्त
  • गृहरक्षक दलाचे २ लाख ३८ हजार जवान, राज्य राखीव दलाच्या १०० तुकड्या, पोलीस सर्व महत्त्वाच्या संवेदनशील ठिकाणी बंदोबस्त ठेवणार
  • ज्यातील अनेक भागांमध्ये पोलीस गस्त वाढवण्यात आली

Strict security measures in Maharashtra to maintain law and order : मुंबई : मुंबईत शरद पवार यांच्या बंगल्याबाहेर एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले. या घटनेमुळे संपूर्ण राज्याची पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे. उद्यापासून महाराष्ट्रात विविध धर्मियांचे धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. या कार्यक्रमांच्या वेळी कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्याचा निर्णय झाला आहे.

कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात पोलीस यंत्रणेला सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. गृहरक्षक दलाचे २ लाख ३८ हजार जवान, राज्य राखीव दलाच्या १०० तुकड्या आणि पोलीस सर्व महत्त्वाच्या आणि संवेदनशील ठिकाणी बंदोबस्त ठेवणार आहेत. राज्यातील अनेक भागांमध्ये पोलीस गस्त वाढवण्यात आली आहे. 

उद्या म्हणजेच गुरुवार १४ एप्रिल २०२२ रोजी आंबेडकर जयंती आणि महावीर जयंती आहे. यानंतर शुक्रवार १५ एप्रिल २०२२ रोजी गुड फ्रायडे आणि शनिवार १६ एप्रिल २०२२ रोजी हनुमान जयंती आणि छत्रपती शिवाजी महाराज पुण्यतिथी आहे. तसेच रविवार १७ एप्रिल २०२२ रोजी ईस्टर संडे आहे. मुस्लिम धर्मियांचा रमझान महिना पण सुरू आहे. या लागोपाठच्या विशेष दिवसांच्या निमित्ताने महाराष्ट्रात अनेक धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. यावेळी अनुचित प्रकार घडू नये म्हणून खबरदारी घेतली जात आहे.

याआधी काल म्हणजेच मंगळवार १२ एप्रिल २०२२ रोजी महाराष्ट्राचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी एक बैठक घेतली. मंत्रालयात झालेल्या या बैठकीला गृह राज्यमंत्री (ग्रामीण) शंभूराज देसाई, अपर मुख्य सचिव आनंद लिमये,मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे, अपर पोलीस महासंचालक राजेंद्र सिंह, मुंबई सह पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील, प्रधान सचिव संजय सक्सेना, अतिरिक्त पोलीस आयुक्त राजीव जैन यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

बैठकीत गृहमंत्र्यांनी पोलीस यंत्रणेला सर्व धर्मियांशी सुसंवाद वाढवण्याच्या सूचना दिल्या. लोकांमध्ये पोलिसांविषयी विश्वास वाढावा आणि कायद्याचा धाक राहावा यासाठी योग्य ती कृती करण्याच्या सूचना गृहमंत्र्यांनी पोलिसांना दिल्या. सोशल मीडियावर आक्षेपार्ह संदेश प्रसारित करणाऱ्यांवर कारवाई करा, असेही गृहमंत्र्यांनी पोलिसांना सांगितले. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी