परिचारिकांचं आजपासून कामबंद; आंदोलनात राज्यभरातून नर्स सहभागी होणार, रुग्णसेवेवर परिणाम होण्याची शक्यता

मुंबई
भरत जाधव
Updated May 26, 2022 | 08:14 IST

आज गुरुवारपासून राज्यभरातील (Statewide) परिचारिकांनी (nurses) कामबंद आंदोलन (agitation) पुकारलं आहे. महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेच्या राज्यातील सर्वच रुग्णालयातील शाखेच्या परिचारिका सहभागी या आंदोलनात सहभागी होणार आहेत. त्यामुळं याचा मोठा परिणाम राज्यभरातील रुग्णसेवेवर पाहायला मिळू शकतो.

Nurses strike from today
परिचारिकांचं आजपासून कामबंद आंदोलन  |  फोटो सौजन्य: Indiatimes
थोडं पण कामाचं
  • बाह्य स्त्रोताद्वारे (कंत्राटी) पदे भरण्यास महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेने तीव्र विरोध केला आहे.
  • 26 आणि 27 मे रोजी परिचारिका काम बंद आंदोलन करणार
  • तोडगा न निघाल्यास 28 मेपासून बेमुदत आंदोलन (Nurses Agitation) करणार असल्याचा इशारा

Statewide strike of nurses  : आज गुरुवारपासून राज्यभरातील (Statewide) परिचारिकांनी (nurses) कामबंद आंदोलन (agitation) पुकारलं आहे. महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेच्या राज्यातील सर्वच रुग्णालयातील शाखेच्या परिचारिका सहभागी या आंदोलनात सहभागी होणार आहेत. त्यामुळं याचा मोठा परिणाम राज्यभरातील रुग्णसेवेवर पाहायला मिळू शकतो. खासगीकरणाला (Privatization) विरोध दर्शवण्यासाठी व इतर मागण्यासाठी परिचारिका संघटनेच्या वतीने 23 मे ते 25 मे पर्यंत राज्यव्यापी आंदोलन केले. मात्र या आंदोलनाची दखल प्रशासनाने घेतली नाही. त्यामुळे 26 आणि 27 मे रोजी परिचारिका काम बंद आंदोलन करणार आहेत. 

बाह्य स्त्रोताद्वारे (कंत्राटी) पदे भरण्यास महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेने तीव्र विरोध केला आहे. त्यामुळे 23 ते 25 मे पर्यंत राज्यात सर्व प्रशासकीय जिल्ह्यातील रुग्णालयात 1 तास काम बंद आंदोलन आणि निदर्शने करायला सुरुवात झाली होती. परंतु याचा सरकारवर काही परिणाम न झाल्यानं आजपासून कामकाज बंद आंदोलन करण्यात येत आहे. बुधवारी संचालकांच्या बैठकीत परिचारिकांच्या मागण्यांबाबत कोणताही निर्णय न घेतला गेल्याने परिचारिकांनी आजपासून कामबंद आंदोलन पुकारलं आहे. 

याशिवाय तोडगा न निघाल्यास 28 मेपासून बेमुदत आंदोलन (Nurses Agitation) करणार असल्याचा इशारा परिचारिंकांनी दिला. आपल्या विविध मागण्यांसाठी राज्यभरातील परिचारिका सोमवारपासून आझाद मैदानात आंदोलन करणार आहेत. केवळ तोंडी आश्वासन महत्त्वाचं नसून लेखी आश्वासनासह त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे, अशी मागणी करत परिचारिकांनी आजपासून आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशाराही दिला आहे.

23 मे पासून सुरू झालेल्या या आंदोलनाचे पडसाद  राज्यात अनेक ठिकाणी पाहायला मिळाले. रुग्णसेवा देत एक तास आंदोलन 23 मे ते 25 मे परिचारिकांनी केले मात्र आंदोलनाची दखल न घेतल्यामुळे आता पूर्णपणे काम बंद आंदोलन परिचारिकांनी पुकारले आहे त्यामुळे याचा परिणाम रुग्णसेवेवर देखील होण्याची शक्यता आहे. परिचारिकांनी वारंवार शासन दरबारी आपल्या मागण्या मांडल्या. मात्र त्या पूर्ण न झाल्याने संतप्त झालेल्या परिचारिकांनी आंदोलन पुकारले आहे. आता यादरम्यान शासनाने चर्चेसाठी वेळ दिला नाही तर 28 मे 2022 पासून संपूर्ण राज्यात बेमुदत आंदोलन करण्यात येणार आहे अशी माहिती परिचारिका संघटनेच्या अध्यक्षा मीनाक्षी शिंदे यांनी दिली आहे.
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी