Student suicide at IIT Bombay Probe transferred to Crime Branch as kin allege foul play : आयआयटी मुंबईमध्ये (Indian Institute of Technology Bombay / IIT Bombay / आयआयटी मुंबई) रविवार 12 फेब्रुवारी 2023 रोजी 18 वर्षांच्या विद्यार्थ्याने हॉस्टेलच्या 7 व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. या प्रकरणी आता क्राईम ब्रँचचे विशेष तपास पथक (Special Investigation Team : SIT) चौकशी करणार आहे. चौकशी पथकाचे नेतृत्व लखमी गौतम करणार आहेत. गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस उपायुक्त कृष्णकांत उपाध्याय आणि सहाय्यक पोलीस आयुक्त जयप्रकाश भोसले हे पण चौकशी पथकात असतील.
दर्शन सोलंकी या 18 वर्षांच्या विद्यार्थ्याने आयआयटी मुंबईच्या हॉस्टेलच्या 7 व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. दर्शनने हे पाऊल जातीच्या मुद्यावरून छळ झाल्यामुळे उचलल्याचा संशय त्याच्या वडिलांनी व्यक्त केला.
अहमदाबादचा दर्शन आयआयटी मुंबईमध्ये बीटेक करत होता. त्याने टोकाचे पाऊल उचलल्यामुळे अनेकांना धक्का बसला. दर्शनच्या बहिणीने तर भावाचा जातीच्या मुद्यावरून छळ सुरू होता आणि पुढे जाऊन त्याची हत्या करण्यात आली असा संशय व्यक्त केला आहे.
दर्शनच्या कुटुंबातील सदस्यांनी व्यक्त केलेल्या संशयानंतर पोलिसांनी नव्याने सखोल तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे. सर्व शक्यतांची बारकाईने तपासणी केली जाईल, असे पोलिसांनी सांगितले.
Holi : गोडधोड खाऊन पोट बिघडले तर करा हे उपाय । या लोकांना पपई खाल्ल्याने होईल नुकसान
कच्ची पपई खा आणि अनेक आजारांपासून लांब राहा । जास्त चिकन खाल तर तब्येत बिघडवाल
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.