10th and 12th Exam : विद्यार्थ्यांनो लक्ष द्या, दहावी-बारावीच्या लेखी परीक्षेबाबत मोठी बातमी 

10th and 12th Exam Dates । मार्च-एप्रिलदरम्यान राज्य शिक्षण मंडळाच्या होणाऱ्या लेखी परीक्षांसाठी लवकरच आढावा बैठक होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 

Students, pay attention, big news about the written exam of 10th-12th
Students, pay attention, big news about the written exam of 10th-12th 
थोडं पण कामाचं
  • मार्च-एप्रिलदरम्यान राज्य शिक्षण मंडळाच्या होणाऱ्या लेखी परीक्षांसाठी लवकरच आढावा बैठक होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 
  •  शिक्षण मंडळाकडून दहावी-बारावीच्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घेतल्या जाणार
  • त्यासाठीचे वेळापत्रकही गेल्या महिन्यापूर्वी जाहीर करण्यात आले आहे. 

10th and 12th Exam updates ।  मुंबई : राज्यात गेल्या आठवड्यापासून कोरोनाच्या रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. काल राज्यात १८ हजारपेक्षा अधिक रुग्ण आढळले. मार्च-एप्रिलदरम्यान राज्य शिक्षण मंडळाच्या होणाऱ्या लेखी परीक्षांसाठी लवकरच आढावा बैठक होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 
 
 शिक्षण मंडळाकडून दहावी-बारावीच्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घेतल्या जाणार असून त्यासाठीचे वेळापत्रकही गेल्या महिन्यापूर्वी जाहीर करण्यात आले आहे. 

SSC And HSC Exam : दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी 'आनंदाची बातमी';  शिक्षण मंडळाने घेतला 'हा' महत्वपूर्ण निर्णय

 
 मुंबई, ठाणे आदी महापालिका क्षेत्रांत दहावी-बारावीचे वर्ग आणि शाळा सुरू असल्या तरी येत्या काही दिवसांत कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटमुळे परिस्थिती बिघडण्याची भीती मंडळातील अधिकाऱ्यांनाही सतावत आहे. त्यामुळेच येत्या काही दिवसांत नऊ विभागीय मंडळांतील परिस्थितीचा आढावा घेतला जाणार आहे; मात्र या परीक्षांमध्ये बदल करण्याचा कोणताही विचार सध्या मंडळापुढे नसल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. 

CBSE दहावी, बारावी टर्म १ च्या परीक्षांच्या निकालासंदर्भात ही महत्वाची बातमी
 
 राज्य शिक्षण मंडळाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार ४ मार्चपासून बारावीची आणि १५ मार्चपासून दहावीची लेखी परीक्षा होणार आहे. २५ फेब्रुवारी ते १४ मार्च या कालावधीत दहावीच्या आणि १४ फेब्रुवारी ते ३ मार्च या कालावधीपर्यंत तोंडी (Oral) व प्रात्यक्षिक (Practical) परीक्षांची सुरुवात होणार आहे. राज्यातील शाळा-महाविद्यालयांमध्ये या परीक्षेच्या सदंर्भात तयारीही सुरू आहे. 


 
 अनेक शाळांनी आपला अभ्यासक्रम पूर्ण करून विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी अधिकचा वेळ देण्यासाठीचे नियोजन केले आहे. मात्र याच काळात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता वाढत असल्याने शिक्षण मंडळाकडून राज्यातील नऊ मंडळांतील परिस्थितीचा आढावा घेतला जाणार असल्याचे सांगण्यात आले.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी