Submarine INS Vagir will induct in Indian Navy on 23 rd January 2023 : आयएनएस वागीर ही पाणबुडी सोमवार 23 जानेवारी 2023 रोजी पुन्हा नौदलाच्या सेवेत दाखल होणार आहे. याआधी आयएनएस वागीर ही पाणबुडी 1973 मध्ये नौदलात दाखल झाली आणि 2001 मध्ये निवृत्त झाली. यानंतर आता सोमवार 23 जानेवारी 2023 रोजी आधुनिक आयएनएस वागीर ही पाणबुडी नौदलाच्या सेवेत दाखल होत आहे. कलवरी श्रेणीतील आयएनएस वागीर ही पाणबुडी भारताची पाचवी स्टेल्थ तंत्राच्या मदतीने विकसित केलेली पाणबुडी आहे. ही पाणबुडी रडारपासून स्वतःचे अस्तित्व लपवून दीर्घकाळ शत्रूवर घातक हल्ले करण्यास सक्षम आहे. फ्रान्सच्या स्कॉर्पिन तंत्राचीही या पाणबुडीच्या विकासाकरिता वापर करण्यात आला आहे.
आयएनएस वागीर ही कलवरी श्रेणीतील सर्वात कमी कालावधीत तयार झालेली आणि चाचणी दरम्यान नौदलातील महिला अधिकाऱ्यांना घेऊन पाण्याखाली प्रवास केलेली एकमेव पाणबुडी आहे. माझगाव गोदीने फ्रान्सच्या ‘स्कॉर्पिन’ तंत्रज्ञानावर आधारित सहा पाणबुड्या तयार केल्या आहेत. त्यातील चार पाणबुड्या सध्या नौदलाला सेवा देत आहेत. सहाव्या पाणबुडीच्या सागरी चाचण्या सुरू होणार आहेत. आयएनएस वागीर ही पाचवी पाणबुडी माझगाव गोदीने मागील महिन्यात नौदलाला सुपूर्द केली होती. तिचे आता २३ जानेवारीला नौदल गोदीत नौदल प्रमुख अॅडमिरल आर. हरिकुमार यांच्या हस्ते कमिशनिंग होत आहे.
वागीर या पाणबुडीचे जलावतरण 12 नोव्हेंबर 2020 रोजी झाले. या पाणबुडीच्या सागरी चाचण्या 1 फेब्रुवारी 2022 पासून सुरू झाल्या. माझगाव गोदीने स्कॉर्पिन तंत्र वापरून तयार केलेल्या 4 पाणबुड्या जलावतरणापासून सरासरी अडीच वर्षांनंतर नौदलाच्या ताफ्यात दाखल झाल्या. पण वागीर ही पाणबुडी दोन वर्षे दोन महिन्यांतच नौदलाच्या ताफ्यात दाखल होत आहे.
IND vs NZ 2nd ODI: न्यूझीलंडवर दणदणीत विजय मिळवत टीम इंडियाने सीरिजही जिंकली
Chandrashekhar Bawankule यांचं Pankaja Munde यांच्याबाबत मोठं विधान
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.