Maharashtra Farmer Suicide : 11 महिन्यात राज्यातील 2489 शेतकऱ्यांची आत्महत्या; विदर्भात सर्वाधिक संख्या!

मुंबई
भरत जाधव
Updated Jan 27, 2022 | 17:59 IST

राज्यातील शेतकरी (Farmers) आत्महत्येची चिंता अजून मिटलेली नाहीये. आपण त्याकडे पाहणं बंद केलं असल्यानं आपल्याला आत्महत्येचं (suicide) वृत्त कळत नाहीये, परंतु महाराष्ट्रावरील आत्महत्येचं संकट अजून तसेच आहे. कृषी क्षेत्राला (Agriculture Sector in India) सातत्याने अतिवृष्टी, पूरस्थिती, प्रतिकूल हवामान, नैसर्गिक आपत्तींचा सामना करावा लागत आहे.

Suicide of 2489 farmers in the state in 11 months
11 महिन्यात राज्यातील 2489 शेतकऱ्यांची आत्महत्या  |  फोटो सौजन्य: Indiatimes
थोडं पण कामाचं
  • कोकण विभागात 2020 ते 2021 या दोन्ही वर्षांत एकाही शेतकऱ्याने आत्महत्या केली नाही.
  • सरकार कर्जमाफीसह अन्य उपाययोजना करत असले शेतकरी आत्महत्या थांबवण्यास अक्षम
  • महाराष्ट्रात 1 जानेवारी ते 30 नोव्हेंबर 2021या कालावधीत 2489 शेतकऱ्यांनी तर 2020 मध्ये 2547 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली.

Farmer Suicide  : नागपूर : राज्यातील शेतकरी (Farmers) आत्महत्येची चिंता अजून मिटलेली नाहीये. आपण त्याकडे पाहणं बंद केलं असल्यानं आपल्याला आत्महत्येचं (suicide) वृत्त कळत नाहीये, परंतु महाराष्ट्रावरील आत्महत्येचं संकट अजून तसेच आहे. कृषी क्षेत्राला (Agriculture Sector in India) सातत्याने अतिवृष्टी, पूरस्थिती, प्रतिकूल हवामान, नैसर्गिक आपत्तींचा सामना करावा लागत आहे. त्यात बाजारभाव आणि भांडवलाची कमतरता आदी प्रश्नांची भर पडत आहे. सातत्याने भेडसावणाऱ्या समस्यांमुळे महाराष्ट्रातील शेतकरी त्रस्त झाला आहे. गेल्या काही वर्षांत शेतकरी आत्महत्यांचं प्रमाण अजून वाढू लागले आहे.

मराठवाडा (Marathwada), विदर्भातील (Vidharbha) शेतकरी अनेक कारणांमुळे आत्महत्या करत आहेत. शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी सरकार कर्जमाफीसह अन्य उपाययोजना करत असले तरी त्याचा परिणाम होत नसल्याचं दिसून येतं आहे. एका माहिती अधिकारातून मिळवलेल्या तपशीलात, महाराष्ट्रात 1 जानेवारी ते 30 नोव्हेंबर 2021या कालावधीत 2489 शेतकऱ्यांनी तर 2020 मध्ये 2547 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. विशेष म्हणजे यापैकी 50 टक्क्यांहून अधिक शेतकरी विदर्भातील असल्याचे स्पष्ट झाले आहे. 2020 मध्ये 2547 शेतकरी आत्महत्यांची नोंद झाली असून यापैकी 1206 प्रकरणं ही राज्य सरकारच्या निकषांनुसार आर्थिक मदतीसाठी पात्र ठरली आहेत. तर 799 प्रकरणे अपात्र घोषित करण्यात आली. सरासरी 50 टक्के आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचे कुटुंबीय राज्य सरकारकडून मिळणाऱ्या 1 लाख रुपयांच्या भरपाईसाठी पात्र असल्याचे आरटीआय अंतर्गत मिळलेल्या माहितीवरून स्पष्ट झाले.

महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्यांविषयी माहिती मिळवण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र घाडगे यांनी माहिती अधिकार कायद्याखाली (Right To Information Act) अर्ज दाखल केला होता. त्यानुसार त्यांना याविषयीची माहिती देण्यात आली. 'शेतकऱ्यांची मानसिक स्थिती, गरज याकडे दुर्लक्ष करून सरसकट कर्जमाफी (Loan Waiver) दिल्यानं शेतकरी आत्महत्येची समस्या सुटणार नाही. ज्या शेतकऱ्यांना मदतीची सर्वात जास्त गरज आहे, अशा संकटग्रस्त शेतकऱ्यांपर्यंत तातडीने मदत पोहचणं आवश्यक आहे', असं यंग व्हीसलब्लोअर्स फाउंडेशनचे घाडगे यांनी सांगितलं. 

मिळालेल्या माहितीचा तुलनात्मक अभ्यास करता, संपूर्ण मराठवाडा क्षेत्राचा समावेश असलेल्या औरंगाबाद विभागात 2020 मध्ये 773 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली होती. मात्र 2021 मध्ये ही संख्या 804 वर पोहोचली. पूर्व विदर्भाचा समावेश असलेल्या नागपूर विभागात 2020 मध्ये 269 शेतकरी आत्महत्या झाल्या होत्या. परंतु, 2021 मध्ये ही संख्या 309 पर्यंत वाढली. पश्चिम विदर्भ क्षेत्राचा समावेश असलेल्या अमरावती विभागात 2020 आणि 2021 अशा दोन्ही वर्षांत सर्वाधिक शेतकरी आत्महत्यांची नोंद झाली आहे. या विभागात 2020 मध्ये 1128 मृत्युंची नोंद झाली होती. 2021 मध्ये नोव्हेंबरपर्यंत ही संख्या 1056 होती. पश्चिम महाराष्ट्रातील पुणे विभागात  2020 मध्ये 26 तर 2021 मध्ये 13 शेतकरी आत्महत्यांची नोंद झाली. उत्तर महाराष्ट्रातील नाशिक विभागात 2020 मध्ये 351 तर 2021 मध्ये 307 शेतकरी आत्महत्यांची नोंद झाली. कोकण विभागात दोन्ही वर्षांत एकाही शेतकऱ्याने आत्महत्या केली नाही.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी