Weird News : अंत्यसंस्कार करून देणारा मराठी माणसाचा स्टार्टअप

Weird News : वेडिंग प्लॅनिंग करणार्‍या कंपन्यांबद्दल तुम्हाला माहित असेल. परंतु आता अंत्यसंस्कार करणारी कंपनीही बाजारात आली आहे. एका मराठी माणसाने ही कंपनी सुरू केली असून आतापर्यंत त्यांनी लाखो रुपयांची उलाढालाही केली आहे. संजय रामगुडे यांचीही सुखांत नावाची कंपनी आहे. दिल्लीत लागलेल्या स्टार्टअपच्या मेळाव्यात रामगुडे यांच्या प्रदर्शनाने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले होते.

थोडं पण कामाचं
  • वेडिंग प्लॅनिंग करणार्‍या कंपन्यांबद्दल तुम्हाला माहित असेल. परंतु आता अंत्यसंस्कार करणारी कंपनीही बाजारात आली आहे.
  • एका मराठी माणसाने ही कंपनी सुरू केली असून आतापर्यंत त्यांनी लाखो रुपयांची उलाढालाही केली आहे.
  • दिल्लीत लागलेल्या स्टार्टअपच्या मेळाव्यात रामगुडे यांच्या प्रदर्शनाने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले होते.

Weird News : मुंबई : वेडिंग प्लॅनिंग करणार्‍या कंपन्यांबद्दल तुम्हाला माहित असेल. परंतु आता अंत्यसंस्कार करणारी कंपनीही बाजारात आली आहे. एका मराठी माणसाने ही कंपनी सुरू केली असून आतापर्यंत त्यांनी लाखो रुपयांची उलाढालाही केली आहे. संजय रामगुडे यांचीही सुखांत नावाची कंपनी आहे. दिल्लीत लागलेल्या स्टार्टअपच्या मेळाव्यात रामगुडे यांच्या प्रदर्शनाने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले होते. ट्विटरवर अनेकांनी त्यांच्या प्रदर्शनाचे फोटो पोस्ट केले असून  याबद्दल माहिती दिली आहे. (sukhant company startup of last rites in india photo gone viral on social media )

रामगुडे यांच्या सुखांत कंपनीच्या अंत्यसंस्काराच्या पॅकेजची सुरूवात साडे आठ हजारांनी सुरू होते. रामगुडे यांच्याकडे ३७ हजार ५०० रुपयांचेही पॅकेज आहे. ज्यांना ज्यांना वाटते की आपले अंत्यसंस्कार योग्य पद्धतीने व्हावे असे लोक सुखांतची ही सेवा घेऊ शकतात. सुखांतकडून मृत व्यक्तीचे संपूर्ण अंत्यसंस्कार केले जातात. मृतदेहासाठी रुग्णावाहिकेची सोय, अंत्यसंस्काराचे सर्व सामानात, टक्कल करण्यासाठी न्हावी इतकेच नाही तर खांदा देण्यासाठी आणि राम नाम सत्य है म्हणण्यासाठी सुखांतकडे मनुष्यबळ आहे. सुखांतने आतापर्यंत ५ हजार जणांचे अंत्यसंस्कार केल्याचा दावा मालक रामगुडे यांनी केला आहे. सध्या कंपनी मुंबई, ठाणे आणि पुण्यात सेवा प्रदान करते. कंपनीकडे सुखांतकडे सध्या १९ जणांचा स्टाफ आहे. आगामी काळात कंपनीकडे १०० ते १५० जणांची टीम असेल. सध्या कंपनीची वार्षिक उलाढाल ५० लाख रुपयांच्या घरात आहे. ही उलाढाल आगामी काळात १०० ते १५० कोटी रुपयांची उलाढाल करण्याचे लक्ष्य रामगुडे यांनी ठेवले आहे. यासाठी ५ लाख जणांना सदस्यत्व देण्याचा टार्गेट कंपनीने ठरवले आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी