Maharashtra Local body Election : मुंबई : राज्यातील जून ते सप्टेंबर हे महिने पावसाळ्याचे असतात त्यामुळे यावेळी निवडणुका घेणे अशक्य आहे अशी माहिती राज्य निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयात दिली आहे. परंतु ज्या भागात पावसाचे प्रमाण कमी आहे, त्या भागात निवडणूक घेण्यास काय अडचण आहे असा सवाल सर्वोच्च न्यायालयाने केला आहे. तसेच जिल्हानिहाय आढावा घेऊन निवडणूक कार्यक्रम जाहीर करावा असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने राज्य निवडणूक आयोगाला दिले आहेत. (supreme court order on maharashtra local government election and rain)
महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू होती. तेव्हा सर्वोच्च न्यायालयाने राज्य निवडणुकीला आदेश दिले आहेत. सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की, ज्या ठिकाणी जास्त पाऊस असतो उदाहरणार्थ कोकण आणि मुंबईत या ठिकाणी निवडणूक पावसाळ्यानंतर घेण्यास हरकत नाही. परंतु मराठवाडा आणि विदर्भात फार पाऊस पडत नाही या भागात निवडणुका होऊ शकतात. ग्रामपंचायत, नगरपरिषद आणि जिल्हापरिषदेच्या निवडणुका घ्यायला हव्या असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. तसेच पावसाळ्याची स्थिती लक्षात घेऊन निवडणुकीच्या कार्यक्रमाचा आराखडा तयार करावा. जिथे पाऊस कमी असतो तिथे फार थांबण्याची गरज नाही असेही सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. राज्य निवडणूक आयोगाने जिल्हानिहाय आढावा घ्या आणि कार्यक्रम जाहीर करावा असे आदेशही सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.
राज्यातील जून ते सप्टेंबर हे महिने पावसाळ्याचे असतात. राज्यातील अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती असते. मुंबई आणि आजूबाजुच्या परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस होतो, अशा वेळी राज्यात निवडणुका घेणे हे अवघड आहे अशी बाजू राज्य निवडणूक आयोगाने मांडली आहे. पावसाळ्यात मोठ्या महानगरपालिकांच्या निवडणुका होणार नाहीत त्यात मुंबई, ठाणे, नागपूर, वसई विरार आणि नाशिक या महानगरपालिकांचा समावेश आहे. या भागात खूप पाऊस होतो म्हणून पावसाळ्यानंतर या भागात निवडणूक होण्याची शक्यता.
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.