SC Rejected Nitesh Rane's Anticipatory bail : मुंबई : शिवसेना कार्यकर्ते (Shiv Sena activist) संतोष परब (Santosh Parab) यांच्यावर हल्ला प्रकरणी भाजप आमदार (BJP MLA) नितेश राणे (Nitesh Rane) अडचणीत सापडले आहेत. नितेश राणे यांच्या अटकपूर्व जामीन (Anticipatory bail) अर्जावर आज सर्वोच्च न्यायालायात (Supreme Court) सुनावणी पार पडली. त्यात न्यायालायाने नितेश राणे यांना मोठा दणका बसला आहे. सर्वोच्च न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळत जिल्हा सत्र न्यायालयासमोर (District Sessions Court) 10 दिवसात शरण या अशी सुचना केली आहे. मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर नितेश राणे यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.
जिल्हा सत्र न्यायालयाने नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता. त्यानंतर नितेश राणे यांच्या वकीलाने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र तिथेही निराशाचं तोंड पाहावं लागलं. मग त्यानंतर अखेर नितेश राणे यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. आज सर्वोच्च न्यायालयात त्यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी पार पडली. शिवसेना कार्यकर्ते संतोष परब यांच्यावर हल्ला झाला होता. त्याचा आरोप शिवसेनेने भाजप आमदार नितेश राणे यांच्यावर आहे. तसेच राज्य विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान देखील आमदार नितेश राणे यांचे एक कृत्य पाहायला मिळाले होते. विधान सभेच्या पायऱ्यावर बसून भाजप नेत्यांनी मंत्री आदित्य ठाकरे विधान भवनात जात असताना म्याव म्यावचा नारा दिला होता.
मुंबई उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर नितेश राणे यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. मात्र येथेही त्यांना दिलासा मिळाला नाही. सर्वोच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला असून, राणेंना जिल्हा सत्र न्यायालयात शरण येण्यास सांगितले आहे. त्यासाठी त्यांना दहा दिवसांचा कालावधी दिला आहे.
18 डिसेंबरला संतोष परब यांच्यावर कणकवलीत हल्ला झाला होता. परब हे जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांचे निकटवर्तीय असून करंजे गावचे माजी सरपंच आहेत. त्यांच्यावर इनोव्हा कारमधून आलेल्या दोघांनी धारदार चाकूने वार केले होते. या हल्ल्यात परब जखमी झाले होते. या प्रकरणाला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकिय शत्रुत्वाची पार्श्वभूमी असल्याच्या संशयावरून पोलिसांनी भाजपच्या गोटात चौकशीची सूत्रे हलवली. मुख्य संशयित आरोपी सचिन सातपुतेला सिंधुदुर्ग ग्रामीण पोलिसांनी दिल्लीतून अटक करण्यात यश मिळवले आहे.
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.