धक्कादायक! सुप्रिया सुळेंसोबत टॅक्सी चालकाचं आक्षेपार्ह वर्तन, रेल्वे मंत्रालयाकडे तक्रार

मुंबई
Updated Sep 12, 2019 | 17:32 IST | टाइम्स नाऊ मराठी

Supriya Sule witnessed strange experience at Dadar: राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांना रेल्वे प्रवासा दरम्यान एका विचित्र अनुभवाचा सामना करावा लागला आहे.

NCP MP Supriya Sule
खासदार सुप्रिया सुळे (फाईल फोटो)  |  फोटो सौजन्य: PTI

थोडं पण कामाचं

  • खासदार सुप्रिया सुळेंना दादर रेल्वे स्थानकात आला विचित्र अनुभव
  • टॅक्सी चालकाने सुप्रिया सुळेंची अडवली वाट
  • सुप्रिया सुळेंनी आरोपी टॅक्सी चालकाचे रेल्वे मंत्रालयाकडे केली तक्रार
  • खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्विट करुन सांगितला घडलेला प्रकार

मुंबई: आपल्या दैनंदिन आयुष्यात काही रिक्षा किंवा टॅक्सी चालकांकडून होणारा त्रास अनेकांना अनुभवायला मिळतो. आता असाच अनुभव खासदार सुप्रिया सुळे यांना आला आहे. सुप्रिया सुळे या रेल्वेने मुंबईतील दादर रेल्वे स्थानकात पोहोचल्या आणि यावेळी एका टॅक्सी चालकाने त्यांचा रस्ता अडवत आक्षेपार्ह वर्तन केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. स्वत: खासदार सुप्रिया सुळे यांनी या संदर्भात ट्विटही केलं आहे.

झालं असं की, राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे या ट्रेनने मुंबईत दाखल झाल्या. मुंबईतील दादर रेल्वे स्थानकात त्यांना उतरायचं होतं. त्याच दरम्यान एक व्यक्ती ट्रेनमध्ये शिरला आणि त्यांनी सुप्रिया सुळे यांची वाट अडवली आणि विनाकारण त्रास देण्यास सुरूवात केली. तुम्हाला टॅक्सी पाहिजे का? असं म्हणत कानाजवळ ओरडू लागला. सुप्रिया सुळे यांनी या संदर्भात ट्विट करत घडलेला प्रकार सांगितला आहे तसेच या प्रकाराची रेल्वे मंत्रालयाकडे तक्रारही केली आहे.

सुप्रिया सुळे यांनी एकूण तीन ट्विट केले आहेत. पहिल्या ट्विटमध्ये त्या म्हणतात, दादर रेल्वे स्थानकात मला एका विचित्र अनुभव आला. कुलजित सिंह मल्होत्रा नावाचा व्यक्ती ट्रेनमध्ये शिरला आणि टॅक्सी पाहिजे का असं वारंवार विचारु लागला. मी त्या व्यक्तीला दोनवेळा नाही म्हटलं तरी त्याने माझा रस्ता अडवला आणि त्रास देऊ लागला. इतकचं नाही तर निर्लज्जपणे फोटोसाठी पोझ देऊ लागला.

दुसऱ्या ट्विटमध्ये सुप्रिया सुळे यांनी रेल्वे मंत्रालयाकडे तक्रार करत म्हणतात,  भारतीय रेल्वे मंत्रालय, कृपया या गोष्टीकडे लक्ष द्या जेणेकरुन प्रवाशांना अशा परिस्थितीचा सामना करावा लागणार नाही. जर दलाली करण्यास कायद्याची परवानगी असेल तर रेल्वे स्थानकात, एअरपोर्टवर अशा प्रकारची दलाली करण्यास परवानगी नसावी. केवळ अधिकृत टॅक्सी स्टँडवरच परवानगी देण्यात यावी.

त्यानंतर तिसऱ्या ट्विटमध्ये खासदार सुप्रिया सुळे यांनी आरपीएफचे आभार मानतं म्हटलं की, घडलेल्या प्रकाराबाबत पोलिसांनी सांगितलं, संबंधित व्यक्ती विरोधात कारवाई करण्यात आली असून त्याला दंड ठोठावला आहे. आरपीएफने घटनेचं गांभीर्य लक्षात घेत कारवाई केल्याबद्दल त्यांचे आभार.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...