मुंबई : राज्याचे माजी मंत्री जितेंद्र आव्हाड (MLA Jitendra Awhad) यांना ठाणे पोलिसांकडून अटक करण्यात आल्यानंतर राष्ट्रवादीच्या जेष्ठ नेत्या सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) यांनी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. राज्यात चाललंय का? जितेंद्र आव्हाड हे लढवय्ये नेते आहेत. त्यांना प्रश्न विचारण्यासाठी बोलावण्यात आलं. तिथं गेल्यावर वरुन दबाव येतोय हे कळलं. वरुन म्हणजे नेमका कुठून दबाव येतो. जो चूक करतो त्याला माफी आणि जो आंदोलन करतो त्याला शिक्षा दिली जाते. हे बघून ब्रिटीशराजचे दिवस आठवतात असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे. दरम्यान, सत्तेत असो किंवा नसो महाराष्ट्राच्या पोलिसांचा आम्हाला सार्थ अभिमान असल्याचं देखील सुळे यांनी म्हटलं आहे.
अधिक वाचा ; काँग्रेस नेत्याने महाराजांची तलवार आणण्यासाठी केली होती धडपड
दरम्यान, पुढे बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, जितेंद्र आव्हाड यांना अटक कशासाठी, त्यांनी कुणाला मारहाण केली का? ते गप्प बसा असं सांगत होते, त्यांनी हातांची घडी घातलेली होती. छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान होत असेल तर दुर्दैवी आहे. सत्ता काबीज करण्यासाठी माणसांनी पातळी सोडावी हे दुर्दैवी असल्याचं सुळे यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्रातील इतिहास अभ्यासक आणि चित्रपटवाले यांच्यात मोठी चर्चा होऊन जाऊद्या, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. छत्रपतींचा अपमान महाराष्ट्र सहन करणार नाही. बांदल कुटुंब विरोधात होतं हे तुम्हाला कुणी सांगितलं. भोरचं ते कुटुंब छत्रपती शिवाजी महाराजांच्यावर प्रेम करतं, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.
अधिक वाचा ; बापाने 14 महिन्यांच्या मुलीला रेल्वेत सोडून अपहरणाचा रचला कट
छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाबद्दल चुकीचं दाखवलं जात असेल आणि एखादी व्यक्ती त्यासंदर्भात वेदना मांडत असेल त्यामुळं जर अटक होत असेल तर आम्ही या अटकेच्या कारवाईचं स्वागत करतो असं देखील सुळे यांनी म्हटलं आहे. त्याचबरोबर, जितेंद्र आव्हाड या कारणासाठी जेलमध्ये गेले असतील त्या कामासाठी आम्हाला सगळ्यांना जेलमध्ये जायला लागलं तरी तयार आहे, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या विरोधात असाल तर सांगा आम्ही ताकदीनं ही लढाई लढू,असं सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.
अधिक वाचा ; लहान मुलांमध्ये अशी ओळखा डेंग्यूची लक्षणे...लगेच करा उपचार
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.