दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या शेजाऱ्याला अटक, एनसीबीची कारवाई

मुंबई
रोहन जुवेकर
Updated Jan 28, 2022 | 19:37 IST

Sushant Singh Rajput death case: 'Drug lord' and late actor's neighbour Sahil Shah arrested by NCB : दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या शेजारी राहणाऱ्या ड्रग तस्कर साहिल शाह (३१) उर्फ फ्लॅको याला अटक झाली आहे.

Sushant Singh Rajput death case: 'Drug lord' and late actor's neighbour Sahil Shah arrested by NCB
दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या शेजाऱ्याला अटक, एनसीबीची कारवाई 
थोडं पण कामाचं
  • दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या शेजाऱ्याला अटक, एनसीबीची कारवाई
  • ड्रग तस्कर साहिल शाह (३१) उर्फ फ्लॅको याला अटक
  • सुशांतच्या शेजारी राहणारा साहिल मागील आठ महिन्यांपासून फरार होता

Sushant Singh Rajput death case: 'Drug lord' and late actor's neighbour Sahil Shah arrested by NCB : मुंबई : दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या शेजारी राहणाऱ्या ड्रग तस्कर साहिल शाह (३१) उर्फ फ्लॅको याला अटक झाली आहे. एनसीबीच्या पथकाने ही कारवाई केली. सुशांतच्या शेजारी राहणारा साहिल मागील आठ महिन्यांपासून फरार होता. 

एप्रिल २०२१ मध्ये एनसीबीने ड्रग प्रकरणात दोन जणांना अटक केली होती. आरोपींकडून ३१० ग्रॅम मारिजुआना जप्त करण्यात आले होते. या आरोपींनी चौकशी सुरू असताना सुशांतच्या शेजाऱ्याचे नाव घेतले होते. ही माहिती मिळताच एनसीबीने त्याला अटक करण्याच्या हालचाली सुरू केल्या. पण एनसीबीचे पथक अटक करण्यासाठी येण्याआधी साहिल फरार झाला. एनसीबीने त्याच्या घरावर धाड टाकली. यानंतर साहिलची माहिती मिळवण्यासाठी अनेकांची चौकशी केली. अखेर साहिलला अटक करण्यात एनसीबीचे पथक यशस्वी झाले. 

गणेश शेरे आणि सिद्धांत अमीन या आरोपींना एप्रिल २०२१ मध्ये अटक केली, त्यावेळी पहिल्यांदा साहिलच्या उद्योगांची सविस्तर माहिती एनसीबीला मिळाली. पण साहिल फरार झाल्यामुळे त्याचा शोध सुरू होता. मध्यंतरीच्या काळात गणेशने २०२१ मध्ये एमपीएससी परीक्षा दिली. सिद्धांत परळच्या एका कॉलेजमध्ये पदवी अभ्यासक्रमाच्या तृतीय वर्षात शिकत आहे.

एनसीबीने साहिलच्या संपर्कात असलेल्या अनेकांवर लक्ष ठेवले होते. पुरती कोंडी झाल्याचे पाहून साहिल एनसीबीला शरण आला. साहिलची पत्नी टीव्ही अभिनेत्री आहे. साहिल शरण येण्याआधी काही काळ दुबईत वास्तव्यास होता. 

साहिलविषयी एनसीबीला सर्वात आधी २०२० मध्ये माहिती मिळाली होती. करण अरोरा आणि अब्बास लखानी यांना ड्रग प्रकरणात अटक करण्यात आले होते. चौकशी सुरू असताना करण आणि अब्बासने साहिलविषयी थोडी माहिती दिली होती. पण साहिलला अटक करण्यासाठी आणखी ठोस माहिती आवश्यक होती. ही माहिती मिळवण्याच्या प्रयत्नांना एप्रिल २०२१ मध्ये यश आले. पण अटकेचा धोका ओळखून साहिल फरार झाला. 

एनसीबीने कोंडी करून साहिलला शरण येण्यास भाग पाडले. शरण येताच साहिलला कायदेशीर कारवाई करून अटक करण्यात आली. आता ड्रग प्रकरणात त्याची चौकशी सुरू आहे. साहिलकडून सुशांतच्या मृत्यू प्रकरणात नवी माहिती मिळण्याची शक्यता आहे. यामुळे एनसीबी साहिलची कसून चौकशी करणार असल्याचे वृत्त आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी