पुणे : देशभरात १८ जुलै २०२२ पासून वस्तू आणि सेवा कर (GST) मधील बदल लागू झाल्याने अनेक जीवनावश्यक वस्तू महाग झाल्या आहेत. याचा फटका थेट सर्वसामान्य जनतेच्या खिशाला कात्री लागणार असल्याचे दिसून येते. त्यामुळे, देशभरात महागाई विरोधात कडाडून विरोध होत असतानाही सेवा कर (GST) मधील झालेल्या बदलामुळे पुन्हा एकदा जनता रस्त्यावर उतरणार असल्याचे चित्र आहे. दरम्यान, सरकारच्या या निर्णयाविरोधात आता स्वाभिमानी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी एक पोस्ट करत मोदी सरकावर हल्ला चढवला आहे.
अधिक वाचा : नीट परीक्षेच्या वेळी विद्यार्थिनींचे अंतरवस्त्र उतरवले
तेल, मीठ, चटणी, तांदूळ, डाळ, दही साखर, वह्या पुस्तके साऱ्यांनाच जीएसटी.. आता स्वस्त आहे फक्त मरण त्याला केव्हा लावता जीएसटी? असा बोचरा सवाल राजू शेट्टी यांनी केला आहे. पेट्रोल, डिझेल गॅस महाग, शिक्षण आवाक्याबाहेर, दवाखाना परडवत नसल्याचं देखील राजू शेट्टी म्हणाले.
अधिक वाचा : नवरीऐवजी मेव्हणीला घातली वरमाला, मग काय धू-धू धुतला..
उघड्यावर विकल्या जाणार्या अनब्रँडेड उत्पादनांवर जीएसटी सूट कायम राहील. अर्थ मंत्रालयाने सोमवारी प्री-पॅकेज केलेल्या आणि लेबल केलेल्या उत्पादनांवरील जीएसटी दरासंबंधी एक FAQ (वारंवार विचारले जाणारे प्रश्न) जारी केले आहेत. त्याचबरोबर, लेबल केलेले (फ्रोझन वगळता) मासे, दही, पनीर, लस्सी, मध, कोरडे मखना, कोरडे सोयाबीन, वाटाणे, गहू आणि इतर उत्पादनांना मान्यता दिली. तृणधान्ये आणि मुरमुऱ्यावर पाच टक्के जीएसटी लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
अधिक वाचा : ४ महिला आमदारांची फसवणूक, तुम्हाला सुद्धा आलाय का असा कॉल?
१ ) 'प्रिंटिंग/ड्रॉइंग इंक', धारदार चाकू, पेपर कटिंग चाकू आणि 'पेन्सिल शार्पनर', एलईडी दिवे, ड्रॉइंग आणि मार्किंग उत्पादनांवरील कर १८ टक्के करण्यात आला आहे. सोलर वॉटर हीटर्सवर आता १२ टक्के जीएसटी लागणार आहे, जो पूर्वी ५ टक्के कर होता.
२ ) प्री-पॅकेज केलेले, लेबल केलेले दही, लस्सी आणि पनीरवर ५ टक्के जीएसटी लागेल. मध, सुका मखना, कोरडे सोयाबीन, वाटाणे, गहू आणि इतर तृणधान्ये आणि तांदूळ यांसारखी उत्पादनेही महाग होतील. आटा, पनीर, लस्सी आणि दही यांसारखे प्री-पॅकेज केलेले आणि लेबल केलेले खाद्यपदार्थ महाग होतील. चणे, बगॅस, तांदूळ, मध तृणधान्ये, मांस, मासे यांचाही यात समावेश आहे.
३ ) ५ हजार रुपयांपेक्षा जास्त भाड्याने घेतलेल्या हॉस्पिटलच्या खोल्यांवर देखील GST भरावा लागेल. याशिवाय दररोज एक हजार रुपयांपेक्षा कमी भाड्याने असलेल्या हॉटेलच्या खोल्यांवर १२ टक्के दराने कर आकारण्याचे सांगण्यात आले आहे.
४ ) बागडोगरा ते ईशान्येकडील राज्यांच्या हवाई प्रवासावर जीएसटी सूट आता फक्त 'इकॉनॉमी' श्रेणीतील प्रवाशांनाच मिळणार आहे.
५ ) टेट्रा पॅक आणि बँकेद्वारे चेक जारी केल्यावर १८ टक्के GST अॅटलससह नकाशे आणि चार्टवर आणि १२ टक्के GST लागू होईल.
१ ) मालाच्या वाहतुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या ट्रक, वाहनांवर इंधन खर्चाचा समावेश होतो, सध्याच्या १८ टक्क्यांऐवजी आता १२ टक्के जीएसटी लागू होईल.
२ ) रोपवे आणि काही सर्जिकल उपकरणे तसेच प्रवाशांच्या वाहतुकीवरील कराचा दर ५ टक्के करण्यात आला आहे. पूर्वी तो १२ टक्के होता.
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.